मालेगाव मध्य : दस्तूर बचाव कमिटीच्या वतीने आमदार मुफ्ती मोहंमद इस्माईल, महिला नगरसेवक शान-ए-हिंद यांच्या नेतृत्वाखाली शहरातील ७० ठिकाणांवर संविधानामधील उद्देशिकाचे सामूहिक वाचन व राष्टÑगीत म्हणून एनआरसी व सीएएबाबत विरोध प्रदर्शन करण्यात आले.यावेळी जनता दलाच्या कार्यकर्त्यांनी सर्वधर्मीय वेशभूषा साकारून साखळदंड बांधून पेरी चौक ते गांधी पुतळा अशी पदयात्रा काढून नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.नागरिकत्व सुधारणा कायदा २०१९ व राष्टÑीय नागरिक नोंदणीच्या विरोध म्हणून शहरात मागील दोन महिन्यांपासून विविध राजकीय, सामाजिक व धार्मिक संघटनांकडून आंदोलन करीत या कायद्याचा विरोध केला जात आहे. या पार्श्वभूमीवर दस्तूर बचाव कमिटीच्या वतीने दुपारी १२ च्या सुमारास किदवाई रस्त्यावरील शहिदोंकी यादगार येथे संविधानामधील उद्देशिकाचे सामूहिक वाचन व राष्टÑगीत म्हणून आंदोलनास प्रारंभ केला. स्थायी समिती सभापती डॉ. खालीद परवेझ, नगरसेवक मुस्तकीम डिग्निटी, अब्दुल बाकी, हाजी युसूफ इलियास, मौलाना अतहर हुसैन अशरफी आदी मान्यवरांच्या नेतृत्वाखाली शहरातील पेरी चौक, नवीन बसस्थानक, चंदनपुरी गेट, सुलेमानी चौक, मुशावरत चौकसह ७० ठिकाणांवर आंदोलन करून विरोध दर्शविण्यात आला. सायंकाळी ४ वाजता किदवाई रस्त्यावरील जनता दल कार्यालयापासून जनता दलाचे कार्यकर्ते अब्दुच रहेमान, मुस्लीम धांडे, आफताब आलम, आरीफ हुसैन यांनी हिंदू-मुस्लीम-शिख-इसाई यांची वेशभूषा साकारली, तर अख्तर हुसैन या ज्येष्ठ नागरिकाने महात्मा गांधींची वेशभूषा साकारत सर्वधर्मीयांचे नेतृत्व केले. मुस्लीम धांडे यांनी स्वत:ला साखळदंडामध्ये जखडून मोठे कुलूप लावले होते. महात्मा गांधी पुतळा येथे सायंकाळी आंदोलनाची सांगता करण्यात आली. यावेळी साजेदा निहाल अहमद, हाजी लईक, नगरसेवक मोहंमद आमीन मो. फारूख यांच्यासह एमआयएम, महागठबंधन आघाडी, जनता दलचे कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.संविधानाच्या उद्देशिकाचे सामूहिक वाचनदस्तूर बचाव कमिटीच्या वतीने नगरसेवक शान-ए-हिंद यांच्या नेतृत्वाखाली फतेह मैदान चौकात महिलांचा विरोध प्रदर्शन झाले. यावेळी माजी नगराध्यक्ष साजेदा निहाल अहमद, शान-ए-हिंद, नगरसेवक सादिया लईक अहमद यांनी महिलांना मार्गदर्शन करीत संविधानाच्या उद्देशिकाचे सामूहिक वाचन केले. या विरोध प्रदर्शनास उल्लेखनीय महिलांच्या उपस्थितीमुळे यास सभेचे स्वरूप प्राप्त झाले होते.
७० ठिकाणांवर एनआरसीला विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2020 11:43 PM
दस्तूर बचाव कमिटीच्या वतीने आमदार मुफ्ती मोहंमद इस्माईल, महिला नगरसेवक शान-ए-हिंद यांच्या नेतृत्वाखाली शहरातील ७० ठिकाणांवर संविधानामधील उद्देशिकाचे सामूहिक वाचन व राष्टÑगीत म्हणून एनआरसी व सीएएबाबत विरोध प्रदर्शन करण्यात आले.
ठळक मुद्देमालेगाव : दस्तूर बचाव कमिटीचा कार्यक्रम