कसबे सुकेणे:- राज्य शासकीय चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची आऊटसोर्सिंग पद्धतीने भरती करण्यास राज्य सरकारी गट ड चतुर्थश्रेणी मध्यवर्ती कर्मचारी महासंघाने तीव्र विरोध केला आहे. राज्य व नाशिक जिल्ह्यातील चतुर्थश्रेणी कर्मचारी कर्मचारी संघटनेने हा अध्यादेश रद्द करण्याची मागणी केली आहे.चतुर्थश्रेणी कर्मचा-यांची पदे सरळसेवा पद्धतीने भरण्यात यावी तसेच अनुकंपा, वारसाहक्क, वर्षानुवर्षे कंत्राटी काम करणाºयांना सेवेत समाविष्ट करण्याची प्रक्रि या प्रलंबित आहेत, ती पूर्ण करण्यात यावी, अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण यांनी केली आहे. दरम्यान आऊटसोर्सिंग पद्धतीने भरती करण्याचा अध्यादेश रद्दबातल न केल्यास राज्यभर चतुर्थश्रेणी कर्मचारी आंदोलन करतील आणि मंत्रालय, सर्व शासकीय कार्यालये तसेच अत्यावश्यक सेवादेखील बंद करतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे. याबाबतचे पत्रदेखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांना दिले आहे.घातकी अध्यादेशामुळे राज्य सरकारी चतुर्थश्रेणी कर्मचाºयांचे अस्तित्व धोक्यात येणार आहे. त्याचबरोबर या कर्मचाºयांची मोठ्या प्रमाणावर गळचेपी आणि दमनशाही सुरू होईल, असे संघटनेने म्हणणे आहे. सध्या वारसाहक्क, अनुकंपा आणि वर्षानुवर्षे कंत्राटी पद्धतीने काम करणाºयांना कायम करण्याची प्रक्रि या बंद आहे. ती राबविल्यास ही वेळ येणार नाही. चतुर्थश्रेणी कर्मचाºयांची संख्या कमी आहे तसेच पदेदेखील भरणे बाकी आहे. पण ही पदे सरळसेवा पद्धतीने भरण्यात यावी, अशी संघटनेची मागणी आहे.शासनाच्या या अयोग्य निर्णयामुळे राज्यातील सर्व चतुर्थ श्रेणी कर्मचारी संतप्त असून हा निर्णय तत्काळ मागे न घेतल्यास राज्यभर तीव्र स्वरु पाचे आंदोलन करून मंत्रालयासह सर्व शासकीय सेवा ठप्प करण्याचा निर्धार करण्यात आला आहे.- भाऊसाहेब पठाण, अध्यक्ष, चतुर्थ श्रेणीकर्मचारी कर्मचारी महासंघ