शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
3
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
4
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
5
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
6
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
7
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
8
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
9
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
10
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
11
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
12
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
13
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
14
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
15
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

अर्जुनसागरमधून पाणी नेण्याच्या योजनेला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2019 12:52 AM

कळवण : सटाणा नगरपालिकेच्या जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा योजनेला शासनाने प्रशासकीय मान्यता दिल्यानंतर ९ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या योजनेचे सटाणा येथे भूमिपूजन करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देकळवण : सर्वपक्षीय नेत्यांनी घेतली भूमिका

कळवण : सटाणा नगरपालिकेच्या जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा योजनेला शासनाने प्रशासकीय मान्यता दिल्यानंतर ९ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या योजनेचे सटाणा येथे भूमिपूजन करण्यात येणार आहे.मुख्यमंत्र्यांनी खुशाल भूमिपूजन करून पाण्याचे गाजर दाखवावे; परंतु पाइपलाइनचा एक पाइपही कळवण तालुक्यात उतरू देणार नसल्याचा पवित्रा कळवण तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस, कॉँग्रेस, शिवसेना, मनसे, शेतकरी संघटना, प्रहार संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच ग्रामस्थांनी घेतल्यामुळे केळझरची पुनरावृत्ती होण्याची चिन्हे दिसत आहेत.अर्जुनसागर (पुनंद) प्रकल्पातून जलवाहिनी जाऊ देण्यास तालुक्यातील जनतेचा विरोध असून, जनतेचा रोष पत्करून मुख्यमंत्री फडणवीस या योजनेचे भूमिपूजन असल्याने कळवण तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे.जलवाहिनी काय पण एक पाइपसुद्धा कळवण तालुक्यात उतरू देणार नाही, कळवण तालुक्यातील शेतकरी बांधवांबरोबर घेऊन जनआंदोलन करू व ही योजना आणि निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू, तापर्यंत तालुक्यात ठिकठिकाणी जनआंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार, बाजार समितीचे सभापती धनंजय पवार, शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष देवीदास पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र हिरे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख अंबादास जाधव, माजी जिल्हाप्रमुख कारभारी आहेर, बाजार समितीचे संचालक शीतलकुमार अहिरे, मनसेचे तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे संदीप वाघ, प्रहार संघटनेचे युवराज पगार, सरपंच प्रकाश पवार, पिंटू मोरेसह तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी दिला आहे.पाणीप्रश्न पेटण्याची चिन्हे पुनंद प्रकल्पातून सटाणा शहरातील जनतेला पिण्यासाठी पाणी देण्यास आमचा विरोध नाही, तर जलवाहिनीद्वारे पाणी नेण्याच्या योजनेला आमचा विरोध आहे, त्यामुळे जलवाहिनीद्वारे पाणी बाहेर जाऊ देणार नाही, अशी भूमिका कळवण तालुक्यातील शेतकरी बांधवांनी घेतली आहे.याविषयी कळवण तालुक्यात झालेल्या ग्रामपंचायतींच्या ग्रामसभेत पुनंद प्रकल्पातून जलवाहिनी जाऊ देण्यास विरोध असल्याचा ठराव करु न शासन दरबारी ठराव पाठवले तरी शासन गंभीर नसून ग्रामसभांच्या ठरावांना शासन गांभीर्याने घेत नसल्याचे समोर आले असल्याने सटाण्याचा पाणीप्रश्न पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.