यावेळी शहर अभियंता कैलास बच्छाव व पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता जयपाल त्रिभुवन यांनी या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. तळवाडे साठवण तलावात दाभाडीला अनधिकृतरीत्या पाणीपुरवठा केला जात असल्याचा आरोप जनता दलाने केला आहे. दाभाडीला पाणी आरक्षित नसताना मालेगावचे हक्काचे पाणी उपसा केला जात आहे. कुठल्याही प्रकारचा पत्रव्यवहार नसताना ठरल्याप्रमाणे करारनामादेखील करण्यात आलेला नाही. याबाबत प्रशासकीय प्रक्रिया सुरू असताना विद्युत पंप टाकून व जलवाहिनी टाकून जलवाहिनीद्वारे पाणी उपसा केला जात आहे. यामुळे संतप्त झालेल्या जनता दलाच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्त कासार यांच्या दालनाबाहेर धरणे आंदोलन केले.
इन्फो
आयुक्तांविरोधी झळकावले फलक
यावेळी मनपा आयुक्त कासार वॉन्टेड असल्याचे फलक झळकावण्यात आले. आयुक्तांच्या कार्यपद्धतीचा निषेध व्यक्त करण्यात आला. आंदोलनात जनता दलाचे मुस्तकीम डिग्निटी, रिजवान खान, मन्सूर अहमद, नगरसेवक अब्दुल बाकी, सय्यद सलीम, अल्ताफ ड्रमवाला, मुस्लीम धांडे, अबू शोएब निहाल, आरिफ हुसेन, सलीम गडबड आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.