घोटी : प्रस्तावित मुंबई - नागपूर समृद्धी महामार्गाबद्दल संभ्रम असून, अधिवेशनात सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी फक्त २६ टक्के जमीन थेट खरेदीद्वारे संपादन केली असल्याची माहिती दिली आहे. यावरून समृद्धी महामार्गास विरोध मावळला हा सरकारचा दावा फोल ठरला आहे. शेतकरी विरोधावर ठाम असून, येत्या १९ डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशनावर संपूर्ण महाराष्ट्रातून मोर्चा काढण्यात येणार आहे.लढ्याचं नियोजन करण्यासंदर्भात इगतपुरी तालुका समृद्धीबाधित संघर्ष समितीची बैठक घोटी येथे राजाराम साळवी मंगल कार्यालयात पार पडली. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शेतकरी लक्ष्मण तात्या गव्हाणे होते. तालुक्यातील शेतकºयांवर सध्या दबावतंत्राचा वापर शासन करत आहे व शेतकºयांचं नेतृत्व करणारेच सध्या दलाली करत आहेत; परंतु शेतकरी कोणालाही भीक न घालता एकजुटीने यावर मात करून सरकारला नमतं घेण्यास भाग पाडू, असे गव्हाणे यांनी यावेळी सूचित केले. या बैठकीस कृती समितीचे अध्यक्ष भास्कर गुंजाळ, अरुण गायकर, दौलत दुभाषे, ज्ञानेश्वर तोकडे, विष्णू वाकचौरे, सुरेश कडू, रामेश्वर शिंदे, शिवाजी भोसले, भाऊसाहेब गुंजाळ, भागवत गुंजाळ, मुकुंद कडू, मधुकर दालभगत, लालू तातळे आदी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
समृद्धीबाधितांचा हिवाळी अधिवेशनावर मोर्चा घोटी : संघर्ष समितीच्या बैठकीत निर्णय; राज्यातून सहभागी होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 11:34 PM
प्रस्तावित मुंबई - नागपूर समृद्धी महामार्गाबद्दल संभ्रम असून, अधिवेशनात सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी फक्त २६ टक्के जमीन थेट खरेदीद्वारे संपादन केली असल्याची माहिती दिली आहे.
ठळक मुद्देसंपूर्ण महाराष्ट्रातून मोर्चा काढणार समृद्धीबाधित संघर्ष समितीची बैठक