नाशिक : नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित गरबा उत्सवातून बुधवारी (दि.१७) रात्री नवीन आडगाव नाका येथून घरी परतत असताना पाठीमागून पल्सर दुचाकीवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी अनिता अविनाश खुटाळे यांच्या गळ्यातील ४५ ग्रॅम वजनाची सोनसाखळी हिसकावून पळ काढला.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नवीन आडगाव नाका सांस्कृतिक कला-क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित दांडिया-गरबा कार्यक्रमातून अनिता खुटाळे भाचीसोबत घरी पायी जात होत्या. यावेळी खुटाळे यांच्या गळ्यातील सोनसाखळी पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोघा भामट्यांनी हिसकावली. संपूर्ण सोनसाखळीत गुंफलेली व मध्यभागी ओम आकाराचे पॅन्डल असलेली सुमारे ९० हजाराची सोनसाखळी चोरट्यांनी हातोहात लंपास केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी अज्ञात संशयित चोरट्यांविरुद्ध पंचवटी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास सहायक निरीक्षक इंगोले करीत आहेत.
पंचवटीत ओरबाडली सोनसाखळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 01:34 IST