नाशिक : जिल्ह्णात सटाणा तालुक्यातील उत्राणे येथील दिव्यांग तरुण प्रवीण कडू पगार या दिव्यांग तरुणास आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या बँक कर्मचाºयांविरोधात तत्काळ कारवाई करण्यासह, मराठा विद्यार्थी वसतिगृहाच्या कामाला वेग देण्यासाठी प्रशासनाला आदेशित करण्याच्या सूचना महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सचिवांना दिल्या आहेत. तसेच अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या कामकाजालाही गती देण्याच्या सूचना पाटील यांनी केल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी दिली आहे. नाशिकच्या मराठा क्र ांती मोर्चातील शिष्टमंडळाने मंगळवारी (दि.२८) मुंबईत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील व नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन प्रशासनाकडून मराठा समाजाच्या भावनांचा अवमान होत असल्याचे निदर्शनास आणून दिले. सटाणा तालुक्यातील उत्राणे येथील दिव्यांग तरुण प्रवीण कडू पगार यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आणणाºया बँक कर्मचाºयांविरोधात गुन्हा दाखल करण्यासह पगार यांच्या कुटुंबातील व्यक्तीला नोकरी देण्याची मागणीही यावेळी केली. याशिवाय अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ केवळ कागदावर अस्तित्वात आहे, मराठा तरुणांना रोजगार व स्वयंरोजगारासाठी कोणतीही आर्थिक मदत मिळालेली नसून मराठा विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह बांधण्याची घोषणा झाल्यानंतरही कारवाई होत नसल्याचे शिष्टमंडळाने चंद्रकांत पाटील व गिरीश महाजन यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने मांडलेल्या समस्यांवर जिल्हा प्रशासनाने तत्काळ कारवाई करण्यासठी आदेशित करण्याच्या सूचना चंद्रकांत पाटील यांनी सचिवांना दिल्या आहेत. या शिष्टमंडळात माजी आमदार माणिकराव कोकाटे, करण गायकर, तुषार जगताप, अमित जाधव, राजेश मोरे, तानाजी गायकर आदींचा सहभाग होता.गणेशोत्सवापूर्वी वसतिगृहाचे भूमिपूजनमराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी बांधल्या जाणाºया वसतिगृहाच्या जागेचा प्रश्न मार्गी लागला असून, सप्टेंबरमध्ये गणेशोत्सवापूर्वी गंगापूररोड परिसरातील जागेवर भूमिपूजन करण्याचा मानस पालकमंत्री गिरीश महाजन यांनी मराठा समन्वयकांशी बोलताना व्यक्त केला. त्यामुळे दि. ८ किंवा १० सप्टेंबर रोजी मराठा विद्यार्थी वसतिगृहाचे भूमिपूजन होण्याची शक्यता असल्याची माहिती नाशिक मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी दिली आहे.
वसतिगृहाच्या कामाला गती देण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 1:50 AM