सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथे गण व गट आढावा बैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना माजी खासदार समीर भुजबळ बोलत होते. राष्ट्रवादी कॉँग्रेस जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस व्यासपीठावर माजी आमदार जयवंत जाधव, पक्षनिरीक्षक बापूसाहेब भुजबळ, महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, दिलीप खैरे, विष्णुपंत म्हैसधुणे, निवृत्ती अरिंगळे, सिन्नर तालुकाध्यक्ष बाळासाहेब वाघ, शहराध्यक्ष नामदेव कोतवाल, वामन पवार, तानाजी सानप, कैलास झगडे आदी उपस्थित होते.राष्टÑवादी कॉँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते यांच्यातील संवादाची दरी दूर करण्यासाठी या अॅपचा उपयोग होणार असल्याचे भुजबळ म्हणाले. या अॅपद्वारे पक्षाचा सर्वसामान्य कार्यकर्ते थेट शरद पवार यांच्यासह पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत संपर्क साधू शकेल असे ते म्हणाले. उंबरदरी धरणाला दोन कालवे असून एक कालव्याचे काम अर्धवट असल्याने निम्म्या भागापर्यंत पाणी जाते. दुसरा कालवा नादुरुस्त आहे. शेतकºयांच्या दृष्टीने हा जिव्हाळ्याचा विषय असल्याने पक्षनेत्यांनी या लक्ष घालण्याची मागणी राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष जयराम शिंदे यांनी प्रास्ताविकात केली. भगीरथ रेवगडे यांनी सूत्रसंचालन केले. अनिल शिंदे यांनी आभार मानले.
अडचणी, विकासकामांसंदर्भात पक्षनेतृत्त्वासोबत संपर्क साधण्यासाठी अॅप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2019 5:57 PM