नाशिक : श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिरातील सशुल्क दर्शन तत्काळ बंद करावे, असे आदेश पुरातत्व खात्याने पत्राद्वारे त्र्यंबकेश्वर देवस्थानला दिले असून, देवस्थान आता काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भगवान त्र्यंबकराजाचे दर्शन कमी वेळेत घेता यावे, रांगेत दीर्घकाळ उभे राहावे लागू नये, यासाठी देवस्थानने २०० रुपये प्रतिव्यक्ती असे देणगी दर्शन गेल्या काही वर्षांपासून सुरू केले आहे. मात्र हा प्रकार बंद करून सर्व भाविकांना समान वागणूक देत रांगेतच कोणत्याही प्रकारचे शुल्क न आकारता दर्शन घेण्याची सक्ती करावी, अशी विनंती पुरातत्त्व खात्याने या पत्राद्वारे केली आहे. पुरातत्त्व खात्याचा आदेश मानायचा की नाही यावर संस्थानच्या विश्वस्तांमध्ये मतभेद असल्याने आदेशाचे पालन केले जाईल की नेहमीप्रमाणे त्याला केराची टोपली दाखविली जाईल, याबाबत आता भाविकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)
त्र्यंबकेश्वरचे सशुल्क दर्शन बंद करण्याचे आदेश
By admin | Published: January 22, 2017 12:33 AM