नाशिक : जिल्ह्यातील काही भागांत झालेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष, कांदा व भाजीपाला पिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश तलाठी व कृषी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून हवामानात अचानक बदल झाला असून, आकाशात ढगांनी गर्दी केल्याने हवेत उष्मा वाढून ऊन-सावलीचा खेळ सुरू आहे. अशा परिस्थितीत सोमवारी दुपारनंतर नाशिकसह राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाºयासह जोरदार पाऊस झाला. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, सिन्नर, निफाड, नांदगाव, दिंडोरी या तालुक्यांनाही पावसाने झोडपून काढले. अचानक आलेल्या या पावसाने शेतकºयांची धांदल उडाली. द्राक्ष बागायतदारांचे त्यामुळे नुकसान झाले. छाटणी झालेल्या द्राक्षाच्या झाडाला लावलेले औषध पावसाच्या पाण्याने धुवून निघाले तर ज्या द्राक्षबागांनी फुलोरा धरला होता, त्याची फुले गळून पडली. द्राक्षांचे मणी गळून पडले. त्याचबरोबर खरिपाचा काढून ठेवलेला कांदा उघड्यावर असल्याने भिजला, मक्याचे कणीसदेखील पावसाच्या पाण्यात भिजल्याचे शेतकºयांनी सांगितले.वस्तुनिष्ठ अहवालाच्या सूचनारब्बीची पिके घेण्यास तयार असलेल्या शेतकºयांना मात्र या अवकाळी पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. तथापि, अगोदरच कमी पावसामुळे खरीप पिकांचे नुकसान झालेल्या शेतकºयांवर अवकाळी पावसाने संकट कोसळल्याने शेतकºयांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. येत्या दोन दिवसांत प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन पंचनाम्यांचा वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याच्या सूचना तलाठी, मंडळ अधिकारी, कृषी अधिकाºयांना देण्यात आल्या आहेत.
नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 1:54 AM