शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

फिनिक्स इन्फ्राविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश

By admin | Published: September 30, 2015 12:07 AM

नागपूरस्थित कंपनी : प्लॉटच्या नावाखाली फसवणूक

नाशिक : प्लॉटच्या नावाखाली गुंतवणूकदारांकडून लाखो रुपयांची गुंतवणूक करून घेऊन प्लॉट वा रक्कम परत न करता फसवूणक करणाऱ्या नागपूरच्या फिनिक्स इन्फ्रा इस्टेट इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीच्या संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हा न्यायालयाने दिले आहेत़ पोलिसांकडे वारंवार तक्रार देऊनही दुर्लक्ष केल्याने तक्रारदारांनी न्यायालयाकडे वैयक्तिक फौजदारी खटला दाखल केला होता़सिडको येथील अमित सावरगावकर, बेबी सोनवणे, गोदावरी लद्दड, अंजना देवस्थळी यांनी नागपूर येथील फिनिक्स इन्फ्रा इस्टेट इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीच्या देवपूर, सिन्नर व नाशिकच्या आॅर्चिड पार्क येथे प्लॉट घेण्यासाठी गुंतवणूक केली होती़ कंपनीने एका प्लॉटसाठी दोन लाख ५६ हजार ७२१ रुपये प्रत्येक गुंतवणूकदारांकडून जमा केले होते़ यानंतर कंपनीने गुंतवणूकदारांबरोबर साठेखत करारनामाही केला, मात्र खरेदी देण्यास टाळाटाळ करीत होती़ कंपनीचे गोविंदनगरमधील कार्यालयाने गुंतवणूकदारांना खरेदी देऊ शकत नाही, असे सांगत १०० टक्के नफा ग्राह्य धरून चार लाख ४२ हजार रुपये देण्याचे मान्य करून स्टेट बँक आॅफ इंडियाचे धनादेश दिले, मात्र ते वटलेच नाहीत़ यानंतर कंपनीने नाशिकचे कार्यालय बंद केले तसेच कंपनीने मौजे देवपूर येथील गट नंबर ११७० / २ या मिळकतीचा व्यवहार केलेला असला तरी ती मिळकतच कंपनीच्या नावावरच नसल्याचे आढळून आले़ तसेच कंपनीचे संचालक प्रदीप राठोड व अधिकारी जितेश नशिने, अहमद जीवानी, मोतीलाल तुकाराम बांडेबुचे, विजय गौतम, चंद्रशेखर देशभ्रतार यांच्यावर मध्य प्रदेशातील इंदौर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे़तक्रारदार अमित सावरगावकर यांनी या फसवणुकीची लेखी तक्रार अंबड पोलीस ठाणे तसेच पोलीस आयुक्तांकडे केली होती़ मात्र या तक्रारीची दखल न घेतल्याने गुंतवणूकदारांनी अ‍ॅड़ राहुल पाटील यांच्यामार्फत जिल्हा न्यायालयात वैयक्तिक फौजदारी खटला दाखल केला होता़ त्यामध्ये न्यायाधीश ढवळे यांनी २३ सप्टेंबर २०१५ रोजी फिनिक्स इन्फ्रा कंपनीच्या अधिकाऱ्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश अंबड पोलिसांना दिले आहेत़ (प्रतिनिधी)