नाशिक : जिल्हा परिषदेच्या शाळांमधील ११ ते १९ वयोगटातील किशोरवयीन मुलींमध्ये सॅनिटरी नॅपकिन व वैयक्तिक स्वच्छतेसंदर्भात जाणीव जागृती करणे व त्यांना माफक दरात सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देण्यासाठी अस्मिता योजना शासनाने हाती घेतली आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या शाळांमधील ११ ते १९ वर्ष वयोगटातील मुलींची नोंदणी नजीकच्या ग्रामपंचायतमधील आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन करण्याच्या सूचना प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी सर्व उच्च प्राथमिक शाळांच्या मुख्याध्यापकांना केल्या आहेत. यात विद्यार्थिनींच्या नावासह इयत्ता, जन्मतारीख, आधार क्रमांक आदी माहिती मुख्याध्यापकांनी ‘आपले सरकार सेवा केंद्रा’वर देऊन ती केंद्रचालकाकडून नोंदणीची प्रक्रि या पूर्ण करून घेण्याच्या सूचना केल्या आहेत. अस्मिता योजनेंतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळेतील किशोरवयीन मुली पात्र आहेत. ग्रामीण भागातील महिला व जिल्हा परिषद शाळेतील ११ ते १९ वयोगटातील किशोरवयीन मुलींना वैयक्तिक स्वच्छता व जनजागृतीबाबत ग्रामविकास विभागातर्फे १ मार्च रोजी अस्मिता योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत जिल्हा परिषद शाळेतील मुलींना अस्मिता कार्ड व माफक दरात सॅनिटरी नॅपकिन्स दिले जाणार आहेत. ग्रामीण भागातील ११ ते १९ वयोगटातील किशोरवयीन मुलींना वैयक्तिक स्वच्छता व जनजागृतीसाठी अस्मिता योजनेअंतर्गत माफक दरात सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेपासून खासगी शाळांमधील किशोरवयीन मुली वंचित राहणार आहेत. त्यामुळे खासगी माध्यमाच्या शाळेतील मुलींनाही या योजनेचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी होत आहे. शहरी भागासोबतच ग्रामीण भागातही खासगी शाळांमध्ये जाणाºया मुलींची संख्या ही मोठ्या प्रमाणात आहे.
मुख्याध्यापकांना आदेश : ‘आपले सरकार केंद्रावर’ माहिती देण्याच्या सूचना ‘अस्मिता’च्या लाभार्थी नोंदणीची प्रक्रिया सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 1:14 AM
नाशिक : जिल्हा परिषदेच्या शाळांमधील ११ ते १९ वयोगटातील किशोरवयीन मुलींमध्ये सॅनिटरी नॅपकिन व वैयक्तिक स्वच्छतेसंदर्भात जाणीव जागृती करणे व त्यांना माफक दरात सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देण्यासाठी अस्मिता योजना शासनाने हाती घेतली आहे.
ठळक मुद्देशाळांमधील ११ ते १९ वर्ष वयोगटातील मुलींची नोंदणी १ मार्च रोजी अस्मिता योजना जाहीर