शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

विरगाव येथील ब्रिटिशकालीन पाटाच्या दुरुस्तीचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2020 4:28 PM

विरगाव : कान्हेरी नदीतून सुकड नाल्यात पाणी टाकण्यासाठी विरगाव येथील नादुरुस्त ब्रिटिशकालीन पाटाची तात्काळ दुरुस्ती करण्याचे लेखी आदेश राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी संबधित विभागाला दिले असून मालेगाव येथील जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता यांना याबाबत नुकतेच लेखी आदेश प्राप्त झाले आहेत.

ठळक मुद्देकान्हेरी नदीतुन थेट सुकड नाल्यात पाणी टाकता येईल अशी रचनाही यात समाविष्ट

विरगाव : कान्हेरी नदीतून सुकड नाल्यात पाणी टाकण्यासाठी विरगाव येथील नादुरुस्त ब्रिटिशकालीन पाटाची तात्काळ दुरुस्ती करण्याचे लेखी आदेश राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी संबधित विभागाला दिले असून मालेगाव येथील जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता यांना याबाबत नुकतेच लेखी आदेश प्राप्त झाले आहेत.विरगाव येथील थळक्षेत्राला आरक्षित तसेच पुरपाण्याचा लाभ व्हावा यासाठी ब्रिटिश काळापासून स्वतंत्र पाटाची निर्मिती करण्यात आली आहे. याद्वारे विरगाव या गावातील शेतीला खरीप तसेच रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात फायदा होत असतो. कान्हेरी नदीतुन थेट सुकड नाल्यात पाणी टाकता येईल अशी रचनाही यात समाविष्ट आहे. मात्र अनेक वर्षांपासून हा पाट बंदावस्थेत पडला असल्याने विरगाव येथील शेतीसिंचनासह सुकड नाल्यात पाणी टाकणे कामी मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. सदर पाणी सुकड नाल्यात टाकण्यासाठी तरसाळी, औंदाणे गावातील जनतेने लोकसहभागातून पुढाकारही घेतला होता. मात्र वारंवार अपयश येत असल्याने अखेर प्रहार संघटनेचे तुषार खैरनार यांनी याप्रश्नी बच्चू कडू यांच्याकडे कैफियत मांडली होती.कान्हेरी नदीचे पुरपाणी सुकड नाल्यात टाकून वनोली, तरसाळी, औंदाणे, यशवंत नगर व सटाणा परिसरातील शेतीचा प्रश्न मार्गी लावला जावा यासाठी येथील शेतकरी वर्गाने वारंवार आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. यासाठी सदर नादुरुस्त पाटाची लोकसहभागातून दुरुस्ती करून अनेक वेळा पुरपाणी सुकड नाल्यात टाकण्यासाठी सदर शेतकरी वर्गाने प्रयत्नही करून पाहिला आहे. मात्र संबधित विभागाच्या बोटचेपी भूमिकेमुळे पाणी असूनही ही गावे आजही तहानलेलीच राहत आहेत. सदर पाटाची तात्काळ दुरुस्ती करण्याचे आदेश आता स्थानिक प्रशासनाला प्राप्त झाल्याने हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागण्याची चिन्हे आहेत.

टॅग्स :Waterपाणीriverनदी