सटाणा : हरणबारी वाढीव उजवा कालवा व केळझर वाढीव कालवा क्रमांक आठच्या कामांचे तातडीने सर्वेक्षण करण्याचे आदेश जलसंपदा विभागाचे राज्यमंत्री विजय शिवतारे व प्रधान सचिव सुर्वे यांनी दिल्याची माहिती बागलाणच्या आमदार दीपिका चव्हाण यांनी दिली.या संदर्भात चव्हाण यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पश्चिम वाहिनी नदी खोऱ्यातून गुजरातकडे वाहून जाणारे वळण योजनांद्वारे उपलब्ध झालेले क्र . ५३.०२ दलघफू पाणी हरणबारी व केळझर वाढीव कालव्यासाठी उपलब्ध झाले आहे. बागलाण तालुका हा अवर्षणप्रवण तालुका आहे. हरणबारी वाढीव उजवा कालवा व केळझर वाढीव कालवा क्र . ८ च्या कामांचे सर्वेक्षण करण्यात यावे, अशी मागणी राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन, राज्यमंत्री विजय शिवतारे यांना दिले असता त्यांनी तातडीने प्रधान सचिवांना सर्वेक्षणाचे आदेश दिले आहेत.शेतकरी आर्थिक अडचणीतसततच्या दुष्काळी परिस्थिीमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. तसेच शेतकरी आत्महत्यांचेही प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. या अनुषंगाने पश्चिम वाहिनी नदी खोºयातून गुजरातकडे वाहून जाणारे वळण योजनांचे ५३.०२ दलघफू पाणी हरणबारी वाढीव उजवा कालवा पारनेर ते सातमाने व केळझर वाढीव कालवा क्र . आठ मुळाणेपासून वायगावपर्यंत मिळावे, अशी मागणी केली होती. या अनुषंगाने विधानमंडळ समितीने मंजुरी दिली आहे. हरणबारी उजवा, केळझर कालव्याच्या सर्वेक्षणाचे आदेशसटाणा : हरणबारी वाढीव उजवा कालवा व केळझर वाढीव कालवा क्रमांक आठच्या कामांचे तातडीने सर्वेक्षण करण्याचे आदेश जलसंपदा विभागाचे राज्यमंत्री विजय शिवतारे व प्रधान सचिव सुर्वे यांनी दिल्याची माहिती बागलाणच्या आमदार दीपिका चव्हाण यांनी दिली.या संदर्भात चव्हाण यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पश्चिम वाहिनी नदी खोºयातून गुजरातकडे वाहून जाणारे वळण योजनांद्वारे उपलब्ध झालेले क्र . ५३.०२ दलघफू पाणी हरणबारी व केळझर वाढीव कालव्यासाठी उपलब्ध झाले आहे. बागलाण तालुका हा अवर्षणप्रवण तालुका आहे. हरणबारी वाढीव उजवा कालवा व केळझर वाढीव कालवा क्र . ८ च्या कामांचे सर्वेक्षण करण्यात यावे, अशी मागणी राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन, राज्यमंत्री विजय शिवतारे यांना दिले असता त्यांनी तातडीने प्रधान सचिवांना सर्वेक्षणाचे आदेश दिले आहेत.शेतकरी आर्थिक अडचणीतसततच्या दुष्काळी परिस्थिीमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. तसेच शेतकरी आत्महत्यांचेही प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. या अनुषंगाने पश्चिम वाहिनी नदी खोºयातून गुजरातकडे वाहून जाणारे वळण योजनांचे ५३.०२ दलघफू पाणी हरणबारी वाढीव उजवा कालवा पारनेर ते सातमाने व केळझर वाढीव कालवा क्र . आठ मुळाणेपासून वायगावपर्यंत मिळावे, अशी मागणी केली होती. या अनुषंगाने विधानमंडळ समितीने मंजुरी दिली आहे.
हरणबारी उजवा, केळझर कालव्याच्या सर्वेक्षणाचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 6:30 PM