नाशिक : ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे-पालवे यांनी दुष्काळावर उपाय म्हणून राज्यभर लागू केलेले जलयुक्त अभियान शिवार जिल्'ात यशस्वी करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी १५ तालुक्यांसाठी १५ खातेप्रमुख संपर्क अधिकारी म्हणून नियुक्त केले आहेत. या नियुक्त केलेल्या संपर्क अधिकाऱ्यांना १८ फेब्रुवारी रोजी नेमून दिलेल्या तालुक्यात जाऊन जलयुक्त शिवार अभियान राबविता येऊ शकते काय? यासह टंचाई निवारणार्थ आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्'ात सलग पाच वर्षे टॅँकरने पाणीपुरवठा करणाऱ्या, तसेच दुष्काळी परिस्थिती असलेल्या गावांचीच या जलयुक्त शिवार अभियानासाठी निवड करण्यात येणार असून, पहिल्या टप्प्यात जिल्'ातील सिन्नर, चांदवड, येवला, नांदगाव, इगतपुरी, पेठ, सुरगाणा यांसह अन्य काही तालुके मिळून एकूण २२९ गावांमध्ये जलयुक्त शिवार राबविण्याबाबत निर्णय झाला आहे. पहिल्या टप्प्यात मात्र जिल्'ातील ९३ गावांमध्येच हे जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येणार असून, त्यात प्रामुख्याने सिन्नर, नांदगाव व चांदवड तालुक्यातील गावांचा समावेश असल्याचे कळते. जलयुक्त शिवार अभियानासाठी बुधवारी (दि.१८) संपर्क अधिकाऱ्यांनी त्यांच्या तालुक्यात जाऊन टंचाई निवारण्यासंदर्भात आढावा बैठक घेण्याचे निर्देश सुखदेव बनकर यांनी खातेप्रमुखांना दिले आहेत. त्यामुळेच पेठ येथे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, तर इगतपुरी तालुक्यात मुख्य लेखा व वित्त अधिकारी राजेंद्र महाले जलयुक्त शिवार अभियानाच्या आढावा बैठका घेणार असून, अन्य खातेप्रमुखही त्यांना नेमून दिलेल्या तालुक्यात जलयुक्त शिवार अभियान यशस्वी करण्याबाबत आढावा बैठक घेणार आहेत.(प्रतिनिधी)
जलयुक्त शिवारासाठी बुधवारी संपर्क अधिकाऱ्यांकडून आढावा सीईओंनी दिले खातेप्रमुखांना आदेश
By admin | Published: February 18, 2015 12:18 AM