नाशिक: कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शासनाने निर्बध अधिक कठोर केले असून जिल्ह्यात त्याची अंमलबजावणी गुरूवारी (दि.८) मध्यरात्रीपासून कोटेकोरपणे केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली.ह्यब्रेक द चैनह्णअंतर्गत राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनांच्या अनुषंगाने हॉस्पिटल्स, रोगनिदान केंद्रे, क्लिनिक, वैद्यकीय विमा कार्यालये, फार्मसी, औषध निर्माण करणाऱ्या संस्था, कंपन्या, सर्जिकल साहित्य आणि चष्मा निर्मिती करणाºया आस्थापना सुरू राहतील. या आस्थापनांवर कोणत्याही वेळेचे बंधन असणार नाही.जीवनावश्यक बाबींच्या दुकानांकडून कोविड मार्गदर्शक नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळून आल्यास अशा आस्थापना कोविड अधिसूचना लागू असे पर्यंत बंद करण्यात येतील असा इशराा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.लग्न समारंभाच्याबाबतीत स्थानिक पोलीस स्टेशनच्या पूर्व परवानगीने मयार्दीत संख्येच्या प्रमाणात फक्त खाजगी जागांमध्ये लग्न समांरभ करता येतील. त्याचप्रमाणे किमान उपस्थिती ठेवून विवाह नोंदणी कार्यालयात देखील विवाह करता येतील. राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार हॉटेल, बँक्वेट हॉल, लॉन्स, मंगल कार्यालये अशा ठिकाणी बाहेरील अभ्यागतांना येण्यास पूर्णपणे मनाई असल्याने अशा ठिकाणी लग्नसमारंभ करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.खाद्यगृह परवाना असलेले फुड जॉइंट्स, रस्त्याच्या कडेचे ढाबे तसेच यासारख्या ठिकाणी थांबून खाण्यास पूर्णत: बंदी करण्यात आली आहे. परंतू अशा खाद्यगृहांमधून पार्सल घेवून जाण्यासाठी परवानगी असणार आहे.कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आस्थापना शेतीशी क्षेत्राशी संबंधित असल्याने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. परंतु या ठिकाणी कोविड विषयक नियमांचे उल्लंघन झाल्यास कोविड विषयक अधिसूचना लागू असे पर्यंत संबंधित आस्थापना बंद करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.अपरिहार्य परिस्थितीमध्ये एखाद्या अभ्यागतास शासकीय कार्यालयात यायचे असल्यास संबंधित अभ्यांगताचा आरटीपीसीआर अहवाल निगेटीव्ह असणे किंवा त्यांचे लसीकरण पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र सोबत असणे अनिवार्य आहे. तसेच शासकीय कार्यालयांमधील अर्धन्यायिक कामकाज देखील आॅनलाइन पद्धतीने चालवण्याच्या सुचना करण्यात आलेल्या आहेत.पाावसाळी पूर्व आणि पूर्व हंगामी शेती क्षेत्रातील कामे सुरु ठेवणे आवश्यक असल्यामुळे शेती निविष्ठा आणि अवजारे आणि पुरक व्यवसायांच्या आस्थापना दररोज सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत सुरु असतीलकोविड-१९ च्या अनुषंगाने लागू करण्यात आलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची जबाबदारी संबंधित आस्थापनांची असणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापना कोविड कालावधीत पर्यंत बंद करण्यात येतील. असे आदेश गुरूवार दि ८ च्या मध्यरात्री १२ वाजेपासून ते ३० एप्रिल च्या मध्यरात्री पर्यंत लागू राहतील, असे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे आदेशात म्हटले आ हे.
आज मध्यरात्रीपासून आदेश अधिकच कठोर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2021 10:16 PM
नाशिक: कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शासनाने निर्बध अधिक कठोर केले असून जिल्ह्यात त्याची अंमलबजावणी गुरूवारी (दि.८) मध्यरात्रीपासून कोटेकोरपणे केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली.
ठळक मुद्देकारवाईचे आदेश: नियम मोडल्यास कोविड संपेपर्यंत दुकाने सील