शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
4
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
5
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
6
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
7
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
8
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
9
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
10
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
11
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
12
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
13
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
14
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
15
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
16
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
17
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
18
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
19
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
20
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!

संघटनेचे प्रत्युत्तर : बनावट कागदपत्रांची करणार चौकशी

By admin | Published: June 21, 2016 10:37 PM

रस्ते, पूल, इमारत म्हणजे बंधारा बांधकाम नव्हे

नाशिक : जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागांतर्गत जलयुक्त शिवार अभियानाच्या ४१ कामांच्या ई-निविदेत सरळ सरळ अनियमितता झाली असून, यात लाखो रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य सुशिक्षित बेरोजगार अभियंता संघटनेने केला आहे.दरम्यान, पेठ तालुक्यातील सीमेंट कॉँक्रीट बंधाऱ्यांच्या कामात महालक्ष्मी मजूर सहकारी संस्थेने सादर केलेली व्हॅट व पॅनकार्डच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी असेल, तर त्याची तत्काळ चौकशी करण्यात येईल, अशी माहिती लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रशेखर वाघमारे यांनी दिली.जलयुक्त शिवार अभियानाच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील गावठा येथील पाझरतलाव दुरुस्तीचे काम वादात सापडले असून, ज्या न्यूनतम संस्थेला कार्तिकी कन्स्ट्रक्शनला हे काम देण्यात आले आहे. त्या संस्थेकडे सारखे काम केल्याचे प्रमाणपत्र (टाईप आॅफ सिमीलर वर्क) नसल्याचा आक्षेप सुशिक्षित बेरोजगार अभियंता संघटनेने घेतला आहे. त्यावर संबंधित संस्थेकडे सार्वजनिक बांधकाम विभागाकडील कॉँक्रीट बांधकाम केल्याचे प्रमाणपत्र ग्राह्ण धरण्यात आल्याचा खुलासा लघुपाटबंधारे विभागाने केला आहे. मात्र त्यावर संघटनेने ब्रिज, बिल्डिंग आणि रोड अर्थात पूल, इमारत व रस्ते यांची बांधकामे म्हणजे बंधाऱ्यांची बांधकामे होत नाही. त्यासाठी वॉटर रिअ‍ॅक्टिंन स्ट्रक्चर म्हणजेच पाणी थांबवून अडविणे हे काम वेगळे असून, त्याला इमारत किंवा रस्ते बांधकामाशी जोडता येत नाही, असे स्पष्ट केले आहे.त्यातच काथरवट (ता. पेठ) येथील सीमेंट कॉँक्रीट बंधाऱ्याच्या कामासाठी सुशिक्षित बेरोजगार अभियंता संजय कोंडाजी आव्हाड यांची कागदपत्रे ग्राह्य धरली जातात आणि त्याच संजय कोेंडाजी आव्हाड यांची चिकाडी (दिंडोरी) सीमेंट कॉँक्रीट बंधाऱ्यासाठी तीच कागदपत्रे कशी अपात्र ठरतात. तोच प्रकार चंद्रशेखर डांगे यांच्याबाबतीत घडला असून, इगतपुरी तालुक्यातील काळुस्ते, मायदरा, कळमाने, कहाडोंळपाडा येथील सीमेंट बंधाऱ्यांच्या कामासाठी डांगे याची कागदपत्रे अपात्र ठरविली जातात आणि तीच कागदपत्रे मुरंबी (ता. त्र्यंबकेश्वर) येथील सीमेंट कॉँक्रीट बंधाऱ्यांच्या कामासाठी कशी पात्र ठरली जातात, असा प्रश्न आता सुशिक्षित बेरोजगार अभियंता संघटनेने केला आहे. जलयुक्त शिवार योजनेतील लाखो रुपयांच्या या सर्वच्या सर्व ४१ कामांच्या ई-निविदांमध्ये मोठा घोळ झाला असून, त्याची चौकशी करण्याची मागणी संघटनेने केली आहे. (प्रतिनिधी)