शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
2
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
3
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
4
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
5
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
6
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
9
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
10
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
11
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
12
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
13
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
14
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
15
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
16
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
17
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
18
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
19
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
20
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन

जंगल संरक्षणासाठी ‘आड’वासीयांचा संघटित लढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 4:11 AM

नाशिक : ‘काम करा लाख मोलाचे, निसर्ग संवर्धनाचे’ या घोषवाक्याप्रमाणे पेठ तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील आडबुद्रुकमधील आदिवासी गावकऱ्यांनी जंगल संरक्षणाचा ...

नाशिक : ‘काम करा लाख मोलाचे, निसर्ग संवर्धनाचे’ या घोषवाक्याप्रमाणे पेठ तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील आडबुद्रुकमधील आदिवासी गावकऱ्यांनी जंगल संरक्षणाचा वसा घेत नैसर्गिक वनाची जोपासना करीत वनजमिनींवरील अतिक्रमण काढण्यास वनविभागाला मदत करत नव्याने मागील चार वर्षांत ४७ हजार रोपांची यशस्वी लागवड केली आहे. चराईबंदी, कुऱ्हाडबंदी, शिकारबंदी या त्रिसूत्रीचे काटेकोरपणे पालन करत वनविभागाच्या हातात देत आडवासीयांकडून जंगल संरक्षणासाठी संघटित लढा दिला जात आहे.

पेठ तालुक्यातील करंजाळीपासून पुढे काही अंतरावर आड बुद्रुक हा अवघ्या ६० ते ७० कुटुंबांचा पाडा शाश्वत विकासाकडे निसर्गसंवर्धन करीत गतिमान होत असून हे शुभ वर्तमान मानले जात आहे. या गावातील तरुणांनी राळेगणसिध्दी, हिरवे बाजार या गावांना शैक्षणिक सहलींद्वारे भेट देत तेथील जल, मृदा व वन संवर्धनातून प्रेरणा घेत आपल्या पाड्यावरील २१७.२१८हेक्टरवरील नैसर्गिक वन जपायचे अन‌् पाड्यावरील ओसाड वनजमिनींवर पुन्हा हिरवाई फुलवायची असा ध्यास घेतला २०११साली वनविभागाने गावकऱ्यांना एकत्र आणून संयुक्त वनव्यवस्थापन समिती गठीत केली. वनविभागाच्या माध्यमातून वनक्षेत्रपाल सीमा मुसळे यांनी मागील वर्षी पाड्यावरील सर्व कुटुंबीयांना स्वयंपकाचा गॅस सिलिंडर-शेगडीचे वाटप केले. या पाड्यावरील गावकऱ्यांनी केवळ वृक्षारोपणावरच भर दिला असे नाही, तर लावलेली वृक्ष जगविण्याचीही काळजी घेतल्याने वनीकरण उत्तम असल्याचे चित्र दिसते.

--इन्फो--

जलसंधारणामुळे विहिरींचा जलस्तर उंचावला

नैसर्गिक जंगलात वनकर्मचाऱ्यांसोबत मिळून दगडी बांध बांधणे, सलग समतल चर खोदणे, पाणवठे निर्मितीमध्ये सहभाग घेतला. पावसाचे पाणी जमिनीत जिरावे यासाठी येथील प्रत्येक घराजवळ शोषखड्डे खोदण्यात आले आहेत. जल, मृदा संधारणाच्या कामे करण्यावरही गावकऱ्यांनी भर दिल्याने येथील भूजल पातळी वाढण्यास मदत झाली. उन्हाळ्यातसुध्दा येथील विहिरी मागील चार ते पाच वर्षांपासून तळ गाठत नसल्याचे गावकरी सांगतात.

--इन्फो--

मानव-वन्यप्राणी संघर्षावर मात

आडच्या नैसर्गिक जंगलात साग, बेहडा, खैर, सादडा, उंबर, धावडा, करवंदे, मोह, करंज आदी देशी प्रजातीची वृक्ष मोठ्या प्रमाणात आहेत. या वृक्षप्रजातीच्या संरक्षणामुळे येथील वन्यजीव बिबट्या, तरस, रानससे, माकड, रानमांजर, सायाळ, मुंगूस, घोरपड यांसारख्या वन्यप्राण्यांसह मोर, घुबड, पोपट यांसह विविध प्रजातींच्या पक्ष्यांचाही अधिवास टिकून राहिलेला दिसून येतो. परिणामी नैसर्गिक अधिवास सुरक्षित राहिल्याने या भागात मानव-वन्यप्राणी संघर्ष निर्माण होत नाही.

--इन्फो--

अशी आहे संयुक्त वनव्यवस्थापन समिती

यशवंत रावजी महाले (अध्यक्ष), पांडुरंग तुकाराम महाले (उपाध्यक्ष), वनपाल शिवाजी बागल (सचिव), धर्मराज महाले, निवृत्ती गायकवाड, अर्जुन गावीत, शिताबाई चौधरी यांच्यासह १२ सदस्यांची समिती वनसंवर्धनासाठी कार्यरत आहे. या समितीचा मुख्य कणा म्हणजे गावातील तरुणाई आहे. येथील तरुणवर्ग हा निसर्ग संरक्षणाचे महत्त्व जाणून असल्याने अवैध वृक्षतोड, तस्करीचे प्रयत्न सहजरित्या हाणून पाडण्यास वनविभागालाही यश येते.

220721\22nsk_34_22072021_13.jpg~220721\22nsk_35_22072021_13.jpg

वन संवर्धन~गॅस वाटप