कसबेसुकेणे : महानुभाव पंथाचे आद्य तीर्थस्थान असलेल्या श्रीक्षेत्र मौजे सुकेणे येथे नुकताच प्रारंभ झाला.नाशिक जिल्हा महानुभाव समिती व श्री दत्त मंदिर संस्थानाच्या संयुक्त विद्यमाने व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. यंदाच्या व्याख्यानमालेचा प्रारंभ महंत सुकेणेकर बाबा, अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे उपाध्यक्ष मनोहरशास्त्री सुकेणेकर, बाळकृष्ण सुकेणेकर, राजधरराज सुकेणेकर, गोपीराजशास्त्री सुकेणेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. व्याख्यानमालेचे पहिले पुष्प अर्जुनराज सुकेणेकर व दत्तराज सुकेणेकर यांनी पंचकृष्ण परंपरा व चरित्र या विषयावर गुंफले. या व्याख्यानमालेत हृषीराज घुगे बाबा, महंत रामचंद्रबाबा, डॉ. किरण देशमुख, सौ. सुनंदा अंजनगावकर, प्रा. जी. आर. ठाकरे, भाऊसाहेब मेढेल महंत अचलपूरकर, प्रा. बाळकृष्ण अंजनगावकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच दत्तोपंत पाटोळे यांच्या भक्तिगीत गायन व भजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. (वार्ताहर)
व्याख्यानमालेचे आयोजन
By admin | Published: October 09, 2014 11:25 PM