सिडको : भारतीय बौद्ध महासभा, अखिल भारतीय सैनिक दल व बी.एम.ए. ग्रुपच्या वतीने आयोजित महाधम्म मेळाव्यानिमित्त गुरुवारी शहरातून जगाला संदेश देणाºया महाधम्म रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत गौतम बुद्धांची मूर्ती, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, जोतिबा व सावित्रीबाई फुले यांचे जिवंत देखावे सर्वाचे लक्ष वेधून घेत होते.सामाजिक प्रबोधनातून लोकपरिवर्तनाकडे वाटचाल व्हावी या उद्देशाने सर्व समाजांत प्रचार-प्रसार होण्याकरिता गेल्या मंगळवार (दि.९) पासून ते येत्या १८ आॅक्टोबरदरम्यान गोल्फ मैदानात हजारो उपासकांच्या उपस्थितीत महाधम्म मेळावा व महाश्रामणेर शिबिराचे आयोजन बी.एम.ए. ग्रुपचे अध्यक्ष मोहन अढांगळे यांच्या वतीने करण्यात आले आहे. यासाठी संपूर्ण शहरात झेंडे लावण्यात आली आहे. तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी भव्य मंडप उभारण्यात आली आहे. गुरु वारी (दि.११) गोल्फ क्लब मैदान येथून महारॅलीला प्रारंभ करण्यात आला. यानंतर अशोकस्तंभ, रविवार कारंजा, मालेगाव स्टँड, पेठ रोड ते थेट म्हसरूळ येथे समारोप करण्यात आला. रॅलीत गौतम बुद्धांची मूर्ती, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, जोतिबा व सावित्रीबाई फुले यांचे जिवंत देखावे सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. महारॅलीत बीएमए ग्रुपचे अध्यक्ष मोहन अढांगळे, वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक रमेश बन्सोड, धम्म बंधू सहभागी झाले होते.विविध संदेशरॅलीमध्ये वाहनांवर शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, लाज वाटायला पाहिजे ती त्यांच्या दुर्गुणाची, कर्तुत्ववान नसली तरी चालेल, पण निष्ठेची माणसं हवीत अशाप्रकारचे डॉ. बाबासाहेबांचे संदेश बघायला मिळाले. या रॅलीत एक हजार श्रामनेर यांनी सहभाग नोंदविला.
जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या ‘महाधम्म रॅली’चे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 12:45 AM