इगतपुरी : हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक समजल्या जाणाऱ्या पिंप्रीसद्रोद्दीन येथील पिर शहंशाह सद्रोद्दीन बाबा उरु सानिमित्त कुस्त्यांचे आयोजन मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. ३५० वर्षापासुन येथे कुस्त्यांची परंपरा आजही कायम राखली जात आहे. यावेळी खासदार हेमंत गोडसे यांच्या उपस्थितीत या जंगी कुस्त्यांना सुरु वात झाली. यात लहान मूलांपासुन तर मोठमोठे पहिलवान पट्टूनीं सहभाग घेतला. विशेष म्हणजे या ठिकाणी कुस्त्यांच्या स्पधैत भाग घेण्यासाठी तालुक्यातुनच नव्हेतर राज्यातुन विविध भागातील स्पर्धकांनी सहभाग घेतला. दर वर्षाप्रमाणे यावेळीही मोठ्या उत्सवात कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य कावजी ठाकरे, उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, माजी आमदार काशिनाथ मेंगाळ, सरपंच मंदाबाई सोनवणे, माजी सरपंच रमेश पाटेकर, गटनेते दौलत बोंडे, नंदलाल भागडे, प्रकाश उबाळे, माजी सदस्य लक्ष्मण ठाकरे, संदीप पाटेकर, तालुका उपप्रमुख रमेश धांडे, प्रशांत कडू, जगन कदम, भास्कर सोनवणे, केरूपाटिल देवकर, ज्ञानेश्वर शेलार, दत्तू जाधव, धनाजी जाधव, विठ्ठल आगान, सुखदेव धोंगडे, हिरामण कवटे, अमजद पटेल, भगवान चव्हाण उपस्थित होते.कुस्त्यांचे आयोजन जिल्हा परिषद सदस्य कावजी ठाकरे यांनी केले होते.
उरु सानिमित्त कुस्त्यांचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2018 5:49 PM