सातपूर येथील प्रगती उद्योग कारखान्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. लांडगे यांनी सांगितले की,आत्मनिभार भारत अंतर्गत आभासी प्रदर्शनात इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम, कोकण रेल्वे यांच्यासह अन्य सार्वजनिक उद्योगांचा सहभाग असून, या प्रदर्शनात वेंडर्स रजिस्ट्रेशनची सोय करण्यात आली आहे. एमएसएमई उद्योगांना आपल्या उत्पादन क्षमता सिद्ध करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रदर्शनाचा सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना व्यवसायवृद्धीसाठी लाभ होणार असल्याची माहिती गोविंद सदामते यांनी दिली. प्रास्तविक लघुउद्योग भारतीचे अध्यक्ष विवेक कुलकर्णी यांनी केले. एमएसएमईचे सदस्य प्रदीप पेशकार यांनी आत्मनिर्भर भारत योजनेची माहिती दिली.
यावेळी उद्योग आघाडीचे अध्यक्ष सतीश कोठारी, सरचिटणीस राजेंद्र अहिरे,लघुउद्योग भारतीचे सरचिटणीस मिलिंद देशपांडे आदी उपस्थित होते.