शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

मनपाच्या स्वच्छतेसह अन्य सेवा ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2020 12:32 AM

विविध मागण्यांसाठी महापालिकेतील विविध कर्मचारी संघटनांनी पुकारलेल्या काम बंदला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळी राजीव गांधी भवनसमोर मोठ्या संख्येने जमलेल्या कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करून निदर्शने केली आणि त्यानंतर आयुक्तांना निवेदन देण्यात आले. विशेष म्हणजे अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या असल्या तरी सफाई कामगार आणि घंटागाडी कामगारदेखील सहभागी झाल्याने ऐन स्वच्छ सर्वेक्षणाच्या तयारीत बाधा निर्माण झाली आणि अनेक ठिकाणी कचरा पडून होता.

ठळक मुद्देसफाई कामगारांचा सहभाग : ऐन स्वच्छता सर्र्वेक्षणाच्या वेळी कचऱ्याचे ढीग

नाशिक : विविध मागण्यांसाठी महापालिकेतील विविध कर्मचारी संघटनांनी पुकारलेल्या काम बंदला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळी राजीव गांधी भवनसमोर मोठ्या संख्येने जमलेल्या कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करून निदर्शने केली आणि त्यानंतर आयुक्तांना निवेदन देण्यात आले. विशेष म्हणजे अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या असल्या तरी सफाई कामगार आणि घंटागाडी कामगारदेखील सहभागी झाल्याने ऐन स्वच्छ सर्वेक्षणाच्या तयारीत बाधा निर्माण झाली आणि अनेक ठिकाणी कचरा पडून होता.या संपात सुमारे ९५ टक्के कर्मचारी सहभागी झाले असल्याचे प्रशासनाच्या सूत्रांनी सांगितले. मात्र, संघटनांनी शंभर टक्के संप यशस्वी झाल्याचा दावा केला आहे.केंद्र शासनाच्या कथित कामगार विरोधी धोरणाच्या विरोधात महापालिकेच्या कामगार कर्मचारी सर्व संघटना कृती समितीने संपात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार सुमारे पाच हजार कर्मचारी आणि कामगार संपात सहभागी झाले होते. सिडकोसह विविध विभागीय कार्यालयांसमोर कर्मचारी जमले होते. तर सकाळी राजीव गांधी भवनसमोर जमण्याचे आवाहन करण्यात आल्याने शेकडो कर्मचाºयांनी ठाण मांडले होते. यावेळी महापालिकेशी संंबंधित विविध मागण्यांना उजाळा देण्यात आला. विशेषत: महापालिकेने सेल्फी हजेरी रद्द करावी, रिक्त पदे त्वरित भरावी, सहाव्या वेतन आयोगाच्या धर्तीवरच महापालिकेत सातवा वेतन आयोग द्यावा, पदोन्नतीची कार्यवाही त्वरित करावी अशाप्रकारच्या विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. डॉ. डी. एल. कराड, प्रवीण तिदमे, गजानन शेलार, गुरुमितसिंग बग्गा, सुरेश मारू, सुरेश दलोड, राजेंद्र मोरे, प्रकाश आहिरे महादेव खुडे, मुकेश शेवाळे, अनिल बहोत, ताराचंद पवार यांच्यासह अन्य पदाधिकाºयांनी महापालिकेच्या मुख्यालयात जाऊन प्रशासन उपआयुक्त मनोज घोडे पाटील यांना निवेदन दिले.दरम्यान, या संपात सर्वच विभागातील कर्मचारी सहभागी झाले होते. पाणीपुरवठा, अग्निशमन दल, आरोग्य व रुग्णालय, सुरक्षा विभाग अशा सर्वच विभागांना संपातून वगळण्यात आले असल्याचे कृती समितीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले असले तरी सफाई कामगार संपात सहभागी झाले होते. तर दुसरीकडे घंटागाडी कामगारदेखील सहभागी झाल्याने अनेक भागात घंटागाड्या आल्या नाहीत. त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागला. नगररचना, घरपट्टी, पाणीपट्टीसह अन्य नागरिकांशी संबंधित सेवा ठप्प झाल्या होत्या. राजीव गांधी भवनात तर दुपारी कर्मचाºयांप्रमाणेच अधिकारीदेखील गायब होते. त्यामुळे मुख्यालयात सुट्टी असल्याचे वातावरण होते.निवेदन स्वीकृतीसाठीही कर्मचारी नाहीकामगार संघटनांनी उपआयुक्त मनोज घोडे पाटील यांना निवेदन दिले. त्याचवेळी त्यांच्याकडून प्रत स्वीकारल्याची स्वाक्षरी आणि शिक्का मागण्यात आला. त्यासाठी कर्मचारी उपलब्ध होता. परंतु त्याने आपण हजेरी लावलेली नसल्याचे सांगितल्याने मागण्यांच्या निवेदनाच्या स्वीकृतीविषयी प्रश्न निर्माण करण्यात आला. अखेरीस उपआयुक्त घोडे पाटील यांनीच स्वीकृतीची सही दिली.सफाई कामगारांनीकाढले मोर्चेया मोर्चात सहभागी झालेल्या सफाई कामगारांनी दोन ठिकाणांहून मोर्चे काढले. वडाळा नाका येथील वाल्मीकी मंदिरापासून वाल्मीकी समाजाने आणि रेड क्रॉस येथून मेहतर समाजाच्या सफाई कामगारांनी सीबीएसवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर मोर्चा आणून निदर्शने केली.बायोमेट्रिकची माहिती मिळणे अशक्यमहापालिकेत किती कर्मचारी हजर आहेत आणि किती गैरहजर आहेत याची माहिती प्रशासनाला उपलब्ध होऊ शकली नाही. हजेरीसाठी महापालिकेत बायोमेट्रिक व्यवस्था असली तरी त्याबाबत संकलित माहिती वरिष्ठांना देण्यासाठी कर्मचारी उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Strikeसंप