ओतूर : कळवण तालुक्यातील ओतूर परिसरात निसर्ग चक्र ीवादळ व मृग नक्षत्रात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने खरीप पिकांच्या पेरणीला सुरुवात झाली आहे.गत दोन वर्ष खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या हातात एकही पीक आले नव्हते, यंदा मात्र पाऊस वेळेवर आल्याने मका, सोयाबीन, भुईमूग, बाजरी, भात व कडधान्य पेरणी करण्यात बळीराजा व्यस्त आहे. पीक कर्ज मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी उसनवार पैसे काढून महागडी खते व बियाणे खरेदी केली आहेत. ओतूर परिसरात ७५ मिलीमीटर पाऊस झाल्याने जमिनीची शांतता झाली आहे. यावर्षी सुरुवातीलाच चांगला पाऊस झाल्याने व मृग नक्षत्रात पेरणी झाल्याने बळीराजा सुखावला आहे. महामारी कोरोनाचे संकट पाहता शेतकरी सोशल डिस्टन्सचे पालन करून मास्क वापरत आहे. गेल्या दोन दिवसांपासून पेरणीस वेग आला आहे.बºयाच ठिकाणी मका पेरणीसाठी ट्रॅक्टरचा वापर करण्यात येत आहे, तरीही काही शेतकºयांनी पारंपरिक पद्धतीने बैलजोडीने पेरणी करण्यास प्राधान्य दिले आहे. कर्ज वसुली स्थगित असल्याने व पाऊस चांगला पडल्याने बळीराजा समाधानी आहे.
ओतूरला खरीप पिकांच्या पेरणीला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2020 10:06 PM