शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

आपलं पर्यावरण संस्था : ‘देवराई’मध्ये अजून ८३५ रोपांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2020 5:39 PM

गेल्या वर्षी पावसाळ्यात वनमहोत्सव साजरा करत संस्थेने या ठिकाणी २ हजार रोपांची लागवड केली होती. सध्या या देवराईमध्ये एकूण रोपांची संख्या १७ हजार झाली आहे. संस्थेच्या स्वयंसेवकांकडून मागील पाच वर्षांपासून या ठिकाणी लावलेल्या रोपांचे संवर्धन केले जात आहे.

ठळक मुद्देछोटेखानी पर्यावरण दिन साजरा

नाशिक : कोरोनाचे सावट यंदा जागतिक पर्यावरणदिनावर असल्यामुळे ‘देवराई’, ‘वनराई’ साकारण्याचा विडा उचलेलेल्या आपलं पर्यावरण संस्थेने सातपूरजवळील देवराईमध्ये नव्याने भारतीय प्रजातीच्या ८०० रोपांची लागवड मोजक्याच स्वयंसेवकांच्या उपस्थितीत शुक्रवारी (दि.५) केली.नाशिक पश्चिम वनविभाग व आपलं पर्यावरण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने यंदा कोरोना आजाराच्या प्रादूर्भावामुळे पर्यावरणदिनाचा वृक्षारोपणाचा कार्यक्रम आटोपशीर घेण्यात आला. जलनगरीशेजारी असलेल्या नाशिक पश्चिम वनविभागाच्या राखीव वनात सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत वनरक्षक व संस्थेचे स्वयंसेवकांनी ८३५ रोपांची लागवड पूर्ण केली. यावेळी वनक्षेत्रपाल विवेक भदाणे, वनपाल मधुकर गोसावी, ओंकार देशपांडे, सचिन आहेर, नगरसेवक दिनकर पाटील, बांधकाम व्यावसयिक सुजीत जाजू, सरपंच दतू ढगे, संस्थेचे अध्यक्ष वृक्ष अभ्यासक शेखर गायकवाड आदि उपस्थित होते. दरम्यान, येथील पाच वर्षांपुर्वी लावण्यात आलेल्या वडाच्या झाडाला खतपाणी देऊन पर्यावरणपूरक पध्दतीने सन्मान देत रोपांच्या लागवडीला सुरूवात करण्यात आली.या रोपांची लागवडवड, कृष्णवड, आसाणा, काळा शिरीष, पांढरा खैर, बांबू, महारूख, मोई, हिवर, बाभूळ, हटरूण, पिंपळ, उंबर, करवंद, काटेपांगारा, पळस, काटेसावर आदी प्रजातीची रोपे लावण्यात आली.

‘देवराई’मधील रोपांची संख्या १७ हजारदेवराई (फाशीचा डोंगर) २०१५ साली ११ हजार रोपांची लागवड लोकसहभागातून करण्यात आली होती. २०१८साली पर्यावरण दिनाच्या औचित्यावरच याच ठिकाणी भारतीय प्रजातीच्या दुर्मीळ अशा ४० ते ४५ प्रकारच्या एक हजार वेलींची लागवड करण्यात आली. गेल्या वर्षी पावसाळ्यात वनमहोत्सव साजरा करत संस्थेने या ठिकाणी २ हजार रोपांची लागवड केली होती. सध्या या देवराईमध्ये एकूण रोपांची संख्या १७ हजार झाली आहे. संस्थेच्या स्वयंसेवकांकडून मागील पाच वर्षांपासून या ठिकाणी लावलेल्या रोपांचे संवर्धन केले जात आहे.

टॅग्स :NashikनाशिकWorld Environment DayWorld Environment Dayforest departmentवनविभाग