पेठ : आमचा गाव आमचा विकास या योजनेअंतर्गत १४ वा वित्त आयोग निधीचे नियोजन आणि कार्यवाहीसाठी धोंडमाळ ग्रामपंचायत अंतर्गत गाव विकास आराखडा तयार करण्यासाठी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले.सरपंच जयवंती वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेच्या प्रारंभी गटविकास अधिकारी नम्रता जगताप यांच्या हस्ते पुण्यतिथी निमित्त गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करणेत आले.महिला सभा घेणेत आली. नम्रता जगताप यांनी महिला वर्गाच्या समस्या, अडचणी जाणून घेतल्या. तसेच अंगणवाडी, आरोग्य, शिक्षण याबाबतीत अडचणी जाणून घेतल्या. त्यांनी १४ वा वित्त आयोग निधी अंतर्गत १० टक्के महिला बालकल्याण या विषयी कोणकोणती कामे घेता येतील याविषयी मार्गदर्शन केल. त्यावर उपाययोजना प्राधान्याने राबवणे बाबत ग्रामसेवक याना सांगितले. तसेच महिलांना बचत गट, आरोग्याच्या समस्या त्यावरील उपाय यावर सविस्तर मार्गदर्शन केले.महिला सभेनंतर बाल सभा धोंडमाळ जि प शाळा या ठिकाणी झाली. विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्या अडचणी, समस्या व त्यावरील उपाय यावर बालसभेत चर्चा झाली. यानंतर वंचित घटक व सर्वसाधारण ग्रामसभा झाली. ग्रामस्थांच्या चर्चेतून धोंडमाळ ग्रामपंचायतँचा वार्षिक तसेच पंचवार्षिक गावविकास आराखडा तयार करणेत आला.या सभेस पेठ पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी नम्रता जगताप, विस्तार अधिकारी बी. एस. पवार, उपअभियंता गवळी, शाखा अभियंता लिलके, कृषी सहाय्यक विकास गडाख, भूषण लोहार, उपसरपंच रामजी वड,सदस्य नामदेव बोके, विठू गायकवाड, काशिराम बोंबले, देवकी शेवरे, लक्ष्मी गायकवाड, भागाबाई जाधव, तुळर्सा पवार , विठाबाई लाखन, भागवत वाघमारे, दिलीप शेवरे, कमलाकर शिंगाडे, ललित शिंगाडे, संतोष कडाळी, भगवान रानडे, आदीे उपस्थित होते.
पेठ तालुक्यात ‘आमचा गाव आमचा विकास’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2019 5:58 PM
पेठ : आमचा गाव आमचा विकास या योजनेअंतर्गत १४ वा वित्त आयोग निधीचे नियोजन आणि कार्यवाहीसाठी धोंडमाळ ग्रामपंचायत अंतर्गत गाव विकास आराखडा तयार करण्यासाठी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले.
ठळक मुद्देधोंडमाळ : विशेष ग्रामसभेव्दारे आराखडा तयार करणार