अनुदानित बियाणांसाठी आलेले अर्ज - १२,४००
लॉटरी किती जणांना- ८०००
कोट-
उसनवार पैसे घ्यावे लागतील
यावर्षी बियाणांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. सर्व खर्च करून पीक उभे करण्यासाठी लागणारा खर्च मोठा आहे. यामुळे अनुदानित बियाणे मिळाले असते तर बरे झाले असते. आता बियाणे खरेदीसाठीही उसनवार पैसे घ्यावे लागतील.
- अशोक गोधडे, शेतकरी
कोट-
दुबार पेरणी करावी लागली तर..
पाऊस चांगला सांगितला जात असला तरी त्याचा भरोसा नाही. महागडे बियाणे घेऊन दुबार पेरणीची वेळ आली तर महागाचे बियाणे परवडणारे नाही. आधीच शेतीमालाला भाव नाही त्यात वाढती महागाईमुळे शेती करावी कशी, असा प्रश्न पडला आहे.
- शंकर गायधनी, शेतकरी
कोट-
अधिकाधिक शेतकऱ्यांना बियाणे द्यावे
आमच्याकडे घरचे बियाणे आहे; पण ते उतरेल की नाही याबाबत शाश्वती नाही. शेतीची मशागत, खत आणि बियाणे यांचे वाढते दर परवडणारे नाही. शासनाने अधिकाधिक शेतकऱ्यांना अनुदानाचे बियाणे द्यायला हवे.
- ज्ञानेश्वर तांबे, शेतकरी