नाशिक : शाळांकडून केल्या जाणाऱ्या शुल्क विनियमन व अन्य कायद्यांच्या उल्लंघनाविषयी प्राप्त तक्रारींसंबंधी शिक्षणाधिकारी भावना राजनोर यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समितीने अहवालात संबंधित शाळांकडून बेकायदेशीररीत्या फी वाढ केली जात असल्याचे मत नोंदवले आहे. अशा शाळांवर तत्काळ कार्यवाही करण्याची शिफारसही या समितीकडून करण्यात आली आहे. शाळांमधील बेकायदेशीर फी वाढ व शाळा व्यवस्थापनाच्या मनमानी कारभाराविरोधात पालकांसह विविध संस्थांनी आंदोलन केल्यामुळे शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून राजनोर समितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीने पीडित पालकांचे पुराव्यासह जबाब घेतले. शाळा विश्वस्त व मुख्याध्यापकांकडूनही सत्य परिस्थिती जाणून घेतली. चौकशीदरम्यान समितीला शाळा प्रशासनाने असहकार्य केल्याचे चौकशीच्या अहवालातून स्पष्ट करण्यात आले आहे. अशा शाळांवर कायदेशीर कार्यवाही करण्याची शिफारस चौकशी समितीने केली आहे. (प्रतिनिधी)
नियमबाह्य शुल्क; कारवाईची शिफारस
By admin | Published: July 10, 2016 10:56 PM