शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
3
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास
4
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
5
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
6
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
7
IND vs BAN : पहिला सामना जिंकताच BCCI ची मोठी घोषणा; दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर
8
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
9
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
10
'वयस्कर' अश्विनला तोड नाय! भारताला अडचणीतून बाहेर काढले; सामना जिंकवला, विक्रमही नोंदवला
11
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
12
'लाफ्टर शेफ' शोला लागली नजर? एकानंतर एक सेलिब्रिटींसोबत अपघात; राहुल वैद्यच्या चेहऱ्यावर...
13
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
14
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
15
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
16
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
17
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
18
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
19
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
20
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज

बस दुर्घटनेतील १२ मृतांपैकी चौघांची ओळख पटली; एका बालिकेचा समावेश, जखमींचा आकडा पोहचला ४३वर

By अझहर शेख | Published: October 08, 2022 7:27 PM

बस दुर्घटनेतील १२ मृतांपैकी चौघांची ओळख पटली असून जखमींचा आकडा ४३वर पोहचला आहे. 

नाशिक : यवतमाळ येथून शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजता निघालेल्या चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या विनावातानुकूलित स्लीपर लक्झरी बसला नाशिक शहरातील तपोवनाजवळ शनिवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला. ट्रकने जोरदार धडक देताच बस समोरील बाजूने पेट घेतला. क्षणार्धात संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. साखरझोपेत असलेल्या बसमधील ५० प्रवाशांनी जीव वाचविण्यासाठी धावपळ केली. परंतु बसमधील बारा प्रवाशांचा या आगीत भाजून दुर्दैवी अंत झाला. ४३ प्रवासी जखमी झाले असून, त्यांच्यावर नाशिक शहरातील जिल्हा शासकीय रुग्णालयासह तीन खासगी रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. मृतांपैकी चौघांची ओळख पटली आहे. 

यवतमाळच्या जुन्या बसस्थानकापासून मुंबईच्या दिशेने मध्यरात्री सुटलेली खासगी नॉन एसी लक्झरी बस (एम.एच२९, अेडब्ल्यू३१००) औरंगाबाद महामार्गावरून पहाटे पाच वाजेच्या सुमारास तपोवनाजवळील जेजूरकरमळा चौफुलीवर पोहोचली. याच अपघाती ब्लॅक स्पॉटवर भरधाव जाणाऱ्या आयशर ट्रकने (जीजे ०५, बीएक्स ०२२६) बसला जोरदार धडक दिली. अपघात पहाटे पाच वाजेदरम्यान घडला. अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या बारा प्रवाशांमध्ये १० पुरुष, एका महिलेसह बालिकेचा समावेश आहे. यापैकी चौघांची ओळख पटली असून यामध्ये अजय मोहन कुचनकार ९१६, रा.मारेगाव, ता.वणी, जि.यवतमाळ), उद्धव भिलंग (५५, रा. परोडी, जि. वाशिम), कल्याणी आकाश मुधोळकर (३), लक्ष्मीबाई नागूराव मुधोळकर (५०, दोघे रा. ता. लोणार, जि. बुलडाणा) यांचा समावेश आहे. उर्वरित मृतांची ओळख उशिरापर्यंत पटू शकलेली नव्हती, असे पोलिसांनी सांगितले. कारण हे सर्व प्रवासी बसच्या आगीमध्ये पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत पोलिसांना आढळून आले. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात ट्रकचालकासह बसचालक ब्रम्हनाथ सोयाजी मनोहर (रा.पोहरादेवी, जि.वाशिम), सहचालक दीपक शेंड यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक इरफान शेख यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. ट्रकचालक, क्लीनर फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

आपत्कालीन मदतवाहिन्या कोलमडल्या?खासगी बसला अपघातानंतर वीस मिनिटांनंतर पोलीस, अग्निशमन दलासह रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. तेथून पुढे आपत्कालीन बचावकार्याला सुरुवात झाली. यामुळे बस अर्धा तास आगीत जळत राहिली. परिणामी बारा प्रवाशांना आपला जीव या दुर्घटनेत गमवावा लागला. बसमधून सुखरूप बाहेर पडलेल्या अनिता चौगुले या महिलेने देखील कोणाचीही लवकर मदत मिळाली नाही, असे सांगितले. पहाटेच्या वेळी आपत्कालीन मदतवाहिन्यांची सेवा कशी कोलमडली, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

जखमींची नावे खालीलप्रमाणे - अजय शेषराव देवगण (२३, रा. यवतमाळ), ज्ञानदेव नथू राठोड (३८, रा.पुसद), दीपक बजरंग शेंडे (४०, रा.यवतमाळ), भगवान श्रीपाद मनोहर (६५, रा.वाशिम). सतीश बाबूराव राठोड (२८, रा.यवतमाळ), निकिता नामदेव राठाेड (२६, रा. यवतमाळ), प्रभादेवी केशव जाधव (५०, रा. वाशिम), भागवत लक्ष्मण भिसे (५८, रा.डोंबिवली), स्वरा ज्ञानदेव राठोड ( २, रा. यवतमाळ), रेहाना पठाण (४५), फरिना पठाण (२२), जैतुलबी पठाण (४५), राहत पठाण (९, सर्व. रा.मुंबई), मालू चव्हाण (२२, रा.मुंबई), अमित कुमार (३४, रा.यवतमाळ), सचिन जाधव (३०), अश्विनी जाधव (२६, दोघे रा. पुसद), हंसराज बागूल (२६, रा.कसारा), पूजा मनोज गायकवाड (२७,), आर्यन गायकवाड (८ दोघे रा. यवतमाळ), मीरा राठोड (६०, रा.यवतमाळ), संतोष सरदार (४५, रा. ४६, रा.भिवंडी), लखन राठोड (२९, रा.यवतमाळ), विशाल पतंगे (२०, रा.बुलडाणा), कुश जाधव (८, रा. यवतमाळ), साहेबराव जाधव (५०, रा.वाशिम). गणेश लांडगे (१९, रा.मुंबई), इस्माईल शेख (४५, रा.केवड), अंबादास वाघमारे (५०, रा.यवतमाळ), पायल रमेश शिंदे (५०, रा. जालना), चेतन आकाश (४), किरण चौगुले (१२, रा.वाशिम). अनिता सुखदेव चौगुले (३५, रा. यवतमाळ), अनिल चव्हाण (२८, रा.पुसद), महादेव धोत्रे (३०,रा.वाशिम).

 

टॅग्स :NashikनाशिकAccidentअपघातDeathमृत्यू