नाशिक : लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर नाशिक शहर पोलिसांकडून नियमित प्रतिबंधित कारवाई सुरू असताना शनिवारी (दि. १६) रात्री ११ वाजेपासून ते रविवारी मध्यरात्री २ वाजेपर्यंत स्वत: पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी रस्त्यावर उतरून गुन्हेगारांविरोधात ‘आॅल आॅउ’ आॅपरेशन राबवित विविध प्रकारच्या गुन्हेगारांना दणका दिला.पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वात शनिवारी रात्री उशिरापासून राबविण्यात आलेल्या मोहिमेत लोकसभा निवडणूक २०१९च्या अनुषंघाने सर्व पोलीस ठाण्यांच्या अंतर्गत अस्थापना, नाकाबंदी, ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह, कोटपा, तडीपार, वॉरंटमधील पाहिजे असलेले गुन्हेगार तपासणी, अवैध हॉटेल, लॉज, धाबे, धर्मशाळा यांच्यासह गुन्हेगार थांबण्याची ठिकाणे, टवाळखोर, ट्रिपल सिट, कागदपत्रे सोबत न बाळगणारे, अशा वेगवेगळ्या स्वरूपाच्या कारवाई करण्यात आल्या. आयुक्तालय हद्दीतील नांदूरनाका, सिन्नर फाटा, संसरी नाका, म्हसरूळ, पिंपळगाव बहुला, एक्स्लो पॉइंट, डीजीपीनगर, नारायणबापू चौक, सिडको, कलानगर, अशा एकूण १५ ठिकाणी १ अधिकारी व ६ कर्मचारी नेमून प्रभावी नाकाबंदी करण्यात आली होती. तसेच प्रत्येक पोलीस ठाण्यांतर्गत चार जवानांची टिम तयार करून ‘आॅल आउट’ आॅपरेशन राबविण्यात आले. या कारवाईत पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्यासह उपायुक्त अमोल तांबे, लक्ष्मीकांत पाटील, माधुरी कांगणे, पौर्णिमा चौघुले यांच्यासह पोलिसांनी मोहिम राबविली़अशी झाली कारवाईपोलिसांनी ‘आॅल आउट’ आॅपरेशन राबवितांना रेकॉर्डवरील ७८ गुन्हेगारांची तपासणी करतानाच २३ तडीपार, २९ गुन्ह्याची पार्श्वभूमी असलेले, २४ वॉण्टेड, अजामीनपात्र वॉरंट असलेले १५ गुन्हेगारांसह ५२ हॉटेल, लॉज, धाब्याचीही तपासणी केली. तसेच ३६ वाहनचालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले.
गुन्हेगारांविरोधात ‘आॅल आउट’ आॅपरेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 1:34 AM
लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर नाशिक शहर पोलिसांकडून नियमित प्रतिबंधित कारवाई सुरू असताना शनिवारी (दि. १६) रात्री ११ वाजेपासून ते रविवारी मध्यरात्री २ वाजेपर्यंत स्वत: पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी रस्त्यावर उतरून गुन्हेगारांविरोधात ‘आॅल आॅउ’ आॅपरेशन राबवित विविध प्रकारच्या गुन्हेगारांना दणका दिला.
ठळक मुद्देकारवाई : पोलीस आयुक्तांची मोहीम