शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

थकीत २३२ कोटीपैकी वसूल अवघे ९७ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2021 11:04 PM

नाशिक - थकबाकी वसुलीसाठी महापालिकेने अभय योजना आखल्यानंतरदेखील अपेक्षित परिणाम दिसून आलेले नाही. २३२ कोटीच्या रुपयाच्या थकबाकीच्या तुलनेत ९७ कोटी रुपये वसूल झाले आहेत. त्यामुळे मनपाच्या उत्पन्नात मोठी घट होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देमनपाची धावपळ सुरूच : १५ फेब्रुवारीनंतर सवलतीत घट

नाशिक - थकबाकी वसुलीसाठी महापालिकेने अभय योजना आखल्यानंतरदेखील अपेक्षित परिणाम दिसून आलेले नाही. २३२ कोटीच्या रुपयाच्या थकबाकीच्या तुलनेत ९७ कोटी रुपये वसूल झाले आहेत. त्यामुळे मनपाच्या उत्पन्नात मोठी घट होण्याची शक्यता आहे.  दरम्यान, १५ फेब्रुवारीपर्यंतच अभय योजनेत शास्तीत ५० टक्के सवलतीची मुदत असून, त्यानंतर २५ टक्के सवलत मिळणार आहे.जकात रद्द झाल्यानंतर घरपट्टी वसुली हे महापालिकेचे महत्त्वाचे उत्पन्नाचे साधन आहे. मात्र, कोरोनामुळे या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. त्यामुळे महापालिकेने थकबाकी वसुलीवर भर दिला. २३२ कोटी रुपयाच्या मोठ्या थकबाकीसाठी प्रशासनाने दोन टप्प्यात अभय योजना जाहीर केली आहे. त्यातील दुसरा टप्पा २८ फेब्रुवारीस संपणार असला तरी अपेक्षित वसुली झालेली नाही.

१ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या या योजनेत १५ जानेवारीपर्यंत थकीत घरपट्टी भरणाऱ्यांना दंडाच्या रकमेत ७५ टक्के सवलत जाहीर करण्यात आली. त्यानंतर १५ फेब्रुवारीपर्यंत थकबाकी भरणाऱ्यांना ५० टक्के तर १६ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी या कालावधीत थकीत घरपट्टी भरल्यास २५ टक्के दंडाच्या रकमेत सवलत मिळणार आहे.

एकूण २३२ कोटी रुपयाच्या थकबाकीत १११ कोटी रुपये शास्ती म्हणजेच दंडाचा समावेश आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी महापालिकेने एक लाख ३० हजार ५५५ मालमत्ताधारकांना नोटिसा बजावल्या असून, त्यात अशाप्रकारची योजना पुन्हा राबविली जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. त्यामुळे अनेकांनी लाभ घेऊन थकबाकीत ७५ आणि ५० टक्के सवलत मिळविली. यामुळे महापालिकेत ९७ कोटी रुपयाची भर पडली आहे. २८ फेबु्वारीनंतर थकबाकीदारांची मालमत्ता जप्त करण्याची कारवाई केली जाणार आहे.मार्चपासून कारवाईचा दणकागेल्या वर्षी महापालिकेने नियमित घरपट्टीतील उद्दिष्ट साध्य करीत १४१ कोटी रुपयाची वसुली केली होती. यंदा १७० कोटी रुपयाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र कोरोनामुळे आर्थिक संकट उद्भ‌वल्याने उद्दिष्टदेखील कमी करण्यात आले आहे. गतवर्षीचा विचार करता ४६ कोटी रुपयाचे उद्दिष्ट घटले असून, त्यामुळे १ मार्चपासून नाशिक महापालिका कारवाईचा बडगा उगारणार आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाbusinessव्यवसाय