शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

अ‍ॅपमार्फत शाळाबाह्य मुलांची नोंदणी

By admin | Published: August 20, 2016 1:02 AM

अ‍ॅपमार्फत शाळाबाह्य मुलांची नोंदणी

 नाशिक : टाटा कन्स्लटंट सवर््िहसेसच्या ‘डिस्क’ इनोव्हेशन सेंटरमधील तिघा विद्यार्थ्यांनी शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांची संपूर्ण अद्ययावत माहितीची नोंद घेणारे मोबाइल अ‍ॅप विकसित केले असून, या अ‍ॅपमार्फत शनिवार, दि. २० आणि सोमवार, दि. २२ रोजी शहरातील शाळा बाह्य मुलांची नोंदणी केली जाणार आहे. सदर शोधमोहिमेसाठी मनपा शिक्षण मंडळाच्या १५० शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून, येत्या ५ सप्टेंबरला त्याबाबतचा अहवाल सादर केला जाणार असल्याची माहिती शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी नितीन उपासनी यांनी पत्रकार परिषदेत दिली. टाटा कन्स्लटंट सवर््िहसेसच्या इनोव्हेशन सेंटरमधील कलम टिमच्या अपर्णा घटे, कनक जेटली आणि श्याम किशोर यांनी शाळाबाह्य मुले शोधून त्यांची नोंद घेणारे मोबाइल अ‍ॅप विकसित केले आहे. सदर अ‍ॅपमार्फत प्रारंभी प्रायोगिक तत्त्वावर जून महिन्यात ‘चाकं शिक्षणाची’ या संस्थेमार्फत ४३१ शाळाबाह्य मुले शोधण्यात आली आणि त्यातील २०० हून अधिक मुलांना विविध शाळांमध्ये प्रवेश मिळवून देण्यात आला. आता दुसरा टप्पा मनपा शिक्षण मंडळामार्फत दोन दिवस राबविण्यात येणार आहे. त्यासाठी मनपा शिक्षण मंडळातील विविध शाळांमधील अ‍ॅण्ड्राइड मोबाइल हाताळू शकणाऱ्या १५० शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. तत्पूर्वी, शहरात ज्या ठिकाणी शाळाबाह्य मुलांची संख्या अधिक असू शकेल अशी १८ ठिकाणे निश्चित करण्यात आली असून, तेथे सदर शिक्षक जाऊन पोहोचणार आहेत. प्रभागनिहाय सदर शोधमोहीम राबविल्यानंतर येत्या मंगळवारी (दि.२३) सर्व माहिती संकलित करून त्यातून निघणारे निष्कर्ष यावर अहवाल तयार केला जाणार आहे. या अहवालाच्या माध्यमातून शाळाबाह्य मुलांच्या गळतीची कारणे, त्यांच्या गरजा याबाबतची माहिती संकलित करून ती शासनाकडे पाठविली जाणार असल्याचेही उपासनी यांनी सांगितले. यावेळी ‘चाकं शिक्षणाची’ संस्थेचे सचिन जोशी यांच्यासह अपर्णा घटे, कनक जेटली व श्याम किशोर उपस्थित होते. (प्रतिनिधी)