एकलहरे : परिसरातील हिंगणवेढे, कोटमगाव, जाखोरी, मोहगाव येथे बहरलेल्या मका पिकावर लष्करीअळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाल्याने हे पीक पूर्णपणे धोक्यात आले आहे.हिंगणवेढे शिवारात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात मक्याची पेरणी केली आहे. मक्याचे कणीस विक्र ी करणे तसेच जनावरांना चारा उपलब्ध व्हावा, याकरिता मक्याची पेरणी केली जाते. मात्र लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने बाधित झालेला मक्याचा चारा जनावरांना घातल्यास जनावरे दगावण्याची शक्यता बळावली आहे. मक्याच्या एका रोपात तीन ते चार अळ्या आतील भागात दिसून येत आहेत. कृषी विभागाने शेतकऱ्यांना फवारणी करण्याचे आवाहन केले आहे. मात्र फवारणीसाठी हजारो रु पये खर्च करूनही अळी आटोक्यात येत नसल्याचे हिंगणवेढे येथील शेतकरी गंगाधर धात्रक यांनी सांगितले. मका पिकापासून उत्पादन तर निघणार नाहीच, चाराही हातचा जातो की काय, अशी भीती व्यक्त होत आहे.
हिंगणवेढे परिसरात मक्यावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2020 11:57 PM