पिंपळगाव बसवंत : फळ माशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून, त्याचा मोठा फटका सर्व पिकांना बसत आहे. फळमाशीने डंक मारल्यामुळे फळाला छिद्र पडते व फळ काळे डाग पडून सडत असल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठी घट होत आहे.
शेतकऱ्यांना मार्केटमध्ये बरेच औषधे उपलब्ध आहेत; परंतु त्याचा काही फायदा मिळत नाही. शेती मालाचे नुकसान करण्यासाठी फळमाशी धुमाकूळ घालत असून, माशी महागडे औषधे मारूनही तिचा प्रादुर्भाव फक्त एक ते दोन दिवस कमी होतो; मात्र नंतर पुन्हा तिचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढत असून, त्यासाठी एकमेव उपाय म्हणजे फळमाशी सापळे लावणे असल्याचे शेती सल्लागार केशव बनकर यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले.
फळमाशीचा पूर्णपणे बंदोबस्त लावण्यासाठी सापळे अत्यंत उपयुक्त ठरत आहे. त्यात आकर्षित होते आणि अडकून मरते परिणामी तिची पुढची पिढी तयार होत नाही. त्यासाठी फळमाशी सापळे फक्त एका शेतकरी बांधवाने लावून उपयोग होत नाही.
-----------------------
....तर परिसर किडीपासून मुक्त होईल
आपल्या परिसरातील शेजारील सर्वच शेतकऱ्यांनी किंवा संपूर्ण गावातील शेतकरी बांधवांनी एकाच वेळी जर एकरी २० ते २५ साफळे लावले, तर (अगदी आज काडी तयार झालेल्या व नवीन ग्रापटिंगसाठी असलेल्या द्राक्ष बागेत ) एक आठवड्यात संपूर्ण परिसर या किडीपासून मुक्त होईल. औषधांचा खर्चदेखील कमी होईल. त्यासाठी आपल्या संपूर्ण परिसरात नियोजन करून सापळे लावले म्हणजे आपल्या येणाऱ्या द्राक्ष हंगाम या किडीपासून मुक्त होईल व आपल्याला नैसर्गिक कीडनियंत्रण मिळेल असे आवाहन पिंपळगाव येथील शेती पीक सल्लागार केशव बनकर यांनी शेतकऱ्यांना केले. (१३ पिंपळगाव १/२)
130821\13nsk_8_13082021_13.jpg
१३ पिंपळगाव १/२