इगतपुरी तालुक्यात खरीप हंगामातील महत्त्वाचे पीक असलेल्या भात या पिकासाठी वातावरणात सातत्याने बदल झाल्याने पिके करपू लागली आहेत. तापमानात अचानक वाढ झाल्यामुळे तसेच उन्हाची तीव्रता वाढल्याने करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्याच प्रमाणात वीज वितरणच्या धोरणामुळे वीज नसल्याने शेताला पाणी भरता येत नाही, भातपिके भरतीवर आले असताना ऊन-पावसाच्या खेळामुळे भातशेती संकटात सापडली आहे. इगतपुरी तालुक्यात भातपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यामुळे यावर्षीही भाताचे उत्पन्न घटण्याची शक्यता शेतकरीवर्गातून वर्तविली जात आहे. या रोगांचा प्रादुर्भाव इगतपुरी तालुक्यातील सर्वच भागात मोठ्या प्रमाणात झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. प्रादुर्भाव झालेल्या शेतपिकांचे तातडीने पंचनामे करावेत आणि वीज वितरण कंपनीने वीज कनेक्शन तोडू नये अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
भातपिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 4:15 AM