नाशिक : एकीकडे कोरोनाचे थैमान सुरु असताना दुसरीकडे वडाळागाव परिसरात मागील काही दिवसांपासून नळांना दूषित पाणी येत आहे. यामुळे दूषित पाण्यावाटे होणा?्या आजाराचे रुग्ण आढळून येण्यास सुरुवात झाली आहे. विषमज्वर, उलट्या, पोटदुखी तर काहींना युरिन इन्फेक्शनसारख्या आरोग्याच्या तक्रारींचा सामना करावा लागत आहे.लॉकडाऊन काळात अचानकपणे कोरोनाचे रुग्ण वडाळागाव भागातून मिळून आल्याने संपूर्ण गाव महापालिका प्रशासनाला प्रतिबंधित म्हणून घोषित करावे लागले होते. अनलॉकनंतर गावातील कोरोना आटोक्यात आल्याचे चित्र आहे. सध्यातरी मागील दीड महिन्यांपासून अपवाद वगळता कोरोनाचे रुग्ण वाढलेले नाही. त्यामुळे प्रशासनासह नागरिकांनाही मोठा दिलासा मिळाला आहे; मात्र मागील पंधरवाड्यापासून गावात विषाणूजन्य आजाराच्या फैलावासोबत दूषित पाण्यातून होणा?्या आजराचे रुग्ण आढळून येऊ लागल्याचे स्थानिक खासगी डॉक्टरांचे म्हणणे आहे. यामुळे महापालिका आरोग्य व पाणीपुरवठा विभागाने दखल घेत या भागात युद्धपातळीवर सर्वेक्षण राबवून घरोघरी भेटी देत सर्दी, खोकला, चढ-उताराचा ताप, पोटदुखी, अतिसार, उलट्या, अंगदुखी, अशक्तपणा, युरिन इन्फेक्शन आदी आरोग्याच्या तक्रारी असणा?्या रुग्णांचा शोध घेण्याची गरज आहे. शहरी आरोग्य अभियानांतर्गत सलग आठवडाभर गावात मोहीम राबविण्याची मागणी होत आहे. गावात होणारा दैनंदिन पाणीपुरवठा व त्याची गुणवत्ताही तपासण्याची गरज आहे. गावाला गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्रातून पाणीपुरवठा केला जातो. या केंद्रावरील शुद्धीकरण यंत्रणा योग्यरीत्या कार्यान्वित आहे का हेदेखील तपासणे गरजेचे आहे. कारण एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव शहरात वेगाने होत असताना नागरिकांत भीतीचे वतावरण निर्माण होऊ लागले आहे. दूषित पाणी आणि विषाणूजन्य आजाराचा प्रादुर्भावातसुध्दा आरोग्याच्या तक्रारींचे लक्षणे कोरोनासारखी असल्यामुळे अनेकांच्या मनात धडकी भरत आहे. याबरोबरच विषमज्वर, हिवताप, डेंग्यूसदृश्य आजराची लक्षणे काही रुग्णांत दिसून येत असल्याचे असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.चिकूनगुण्या, डेंग्यूसदृश्य आजाराची भीतीगेल्या वर्षी वडाळा गावात चिकुणगुण्यासदृश्य आजाराचा फैलावही झाला होता. तसेच डेंग्यूचेही रुग्ण आढळून आले होते. दाट लोकवस्ती आणि लहान-लहान घरे असल्याने रहिवाशी पाण्याचा साठा विविधप्रकारे करुन ठेवतात. पाणीसाठे वेळोवेळी स्वच्छ केली जात नसल्याने वडाळागावात यापूर्वी डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती करणा?्या अळ्या, कोष, अंडी घरगुती पाणीसाठ्यात आढळून आलेली आहेत. सध्या गावात मोठया प्रमाणात डासांचा उपद्रव वाढलेला असून नागरिकांना आपल्या घरात, दुकानात सकाळ संध्याकाळ डास प्रतिबंधात्मक अगरबत्ती, लिक्विड यंत्र सुरु ठेवावे लागत आहे. वडाळ्यात डास प्रतिबंधात्मक वस्तुंना मोठी मागणी असल्याचे विक्रेते सांगतात.