नाशिक : सर्वसाधारण तसेच आदिवासी उपयोजनांबरोबरच रखडलेल्या प्रकल्पांच्या पूर्ततेसाठी जिल्ह्याला १८५ कोटींच्या वाढीव निधीची तरतूद करण्यात आहे. जिल्ह्याातील विविध खात्यांकडून करण्यात आलेल्या प्रस्तावांची आवश्यकता लक्षात घेऊन जिल्ह्यासाठी वाढीव निधीची आवश्यकता असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितले.गेल्या १८ रोजी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली त्यावेळी ७९१ कोटींच्या निधीपैकी केवळ १६६ कोटी रुपयेच खर्च झाल्याची बाब समोर आल्याने पालकमंत्री संतापले होते. त्यांनी अधिकाऱ्यांना आणखी दहा दिवसांची मुदत देत निधी खर्चाबाबतचे प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा नियोजन समितीच्या फेर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध खात्यांचा आढावा घेण्यात आला. गेल्या दहा दिवसांत प्राप्त निधीच्या तुलनेत खर्चाची टक्केवारी २३ टक्क्यांवरून ४० टक्क्यांवर गेल्याने पालकमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. ७९१.२३ मंजूर निधीपैकी ४७४.७४ कोटींचा निधी प्राप्त झाला असून, त्यापैकी ३१४.७३ कोटींचा निधी खर्च करण्यात आल्याचे जिल्'धिकाऱ्यांनी सांगितले. कामांची प्रगती सुधारत असली तरी ही आकडेवारी अधिक वाढण्यासाठी आवश्यकतेनुसार कामांचा दर्जा राखत कामांची गती वाढविण्याची अपेक्षा पालकमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली. सर्वसाधारण योजनांसाठी ७८ कोटी, आदिवासी उपयोजनेसाठी ७३.२४ आणि गंगापूर बोट क्लब, कलाग्राम, शिवाजी स्टेडियम आणि जिल्'ाचा दीडशे वर्ष सोहळा तसेच साहसी प्रशिक्षण केंद्रासाठी विशेष बाब म्हणून ३४ कोटी अशी आणखी १८१ कोटींची विशेष निधीची मागणी करण्यात आली आहे.जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आयोजित जिल्हा नियोजन फेर आढावा बैठकीप्रसंगी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्यासह जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, खासदार भारती पवार, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सयाजीराव गायकवाड, आमदार दिलीप बनकर, हिरामण खोसकर, सुहास कांदे, नरहरी झिरवाळ, माणिकराव कोकाटे, सीमा हिरे, देवयानी फरांदे, नितीन पवार, नरेंद्र दराडे, किशोर दराडे, अॅड. राहुल ढिकले उपस्थित होते.जिल्हाधिकाºयांनी सविस्तर सादरीकरण केले. यावेळी त्यांनी जिल्हा नियोजनातील कामाची प्रगती, तसेच प्रस्तावांची पूर्तता आदींचा सविस्तर तपशील सादर केला. विविध क्षेत्रातील वाढीव निधीची मागणी आदींचा आराखडा त्यांनी सादर केला.
जिल्ह्यासाठी १८५ कोटींच्या वाढीव निधीचा आराखडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2020 12:13 AM