नाशिक : भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री काळाराम मंदिर पूर्व दरवाजा बाहेर सुशोभीकरणाचे काम सुरू असताना काही महिन्यांपूर्वी दगडी चबुतरा व पायऱ्या आढळून आल्या होत्या. या घटनेला तब्बल आठ महिन्यांचा कालावधी लोटला असला तरी अद्याप काळाराम मंदिर बाहेरील सुशोभीकरणाचे काम न झाल्याने भाविकांनी नाराजी व्यक्त केली आहे. अनेक महिन्यांपासून हे काम रखडल्याने काम कधी पूर्ण होणार याबाबत तर्कवितर्कवर्तिवले जात आहे. आगामी रामनवमी, रथोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अपूर्ण काम त्वरित पूर्ण करण्याची मागणी शेकडो रामभक्तांनी केली आहे. गेल्या वर्षापासून राममंदिर बाहेरचा परिसर सुशोभिकरण काम शासनाच्या माध्यमातून सुरु करण्यात आले. या कामासाठी पूर्व दरवाजाच्या बाहेरील परिसर खोदकाम करत असताना तीन ते चार फुटांवर दगडी पायºया आढळून आल्या होत्या तर पायऱ्यांचे अजून काही गूढ आहे का हे शोधण्यासाठी आजूबाजूचा काही परिसर खोदण्यात आला होता. सदर पायºया आणि चबुतरा पुरातन असल्याने त्याला कोणताही धक्का न लावता काम सुरू करण्यात आले होते तसेच सुशोभिकरण काम करताना मंदिरासमोर खोदकाम केलेल्या जागेत पुरातन दगड लावण्यात येणार असल्याचे त्यावेळी स्पष्ट केले होते. सुशोभीकरणासाठी खोदकाम करून अनेक महिने लोटले असले तरी अद्याप पर्यंत सुशोभिकरणाच्या कामाला गतीने मिळाल्याने रामनवमी उत्सव सुरु होण्यापूर्वी सदर सुशोभीकरणाचे काम पूर्ण होणार का यावर सध्यातरी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काळाराम मंदिर पूर्व दरवाजासमोरील रस्ता खोदकाम केल्याने मंदिरात देव दर्शनासाठी येणाºया भाविकांना उत्तर व दक्षिण दरवाजाने मंदिरात दर्शनासाठी येजा करावी लागत आहे. राम मंदिर संपूर्ण भारतात प्रसिद्ध असल्याने देशभरातील भाविक राममंदिर बघण्यासाठी येतात काही दिवसांपासून राममंदिर बाहेरील परिसर सुशोभीकरण काम सुरू करण्यात आले खरे मात्र सध्या काम कासवगतीने सुरू असल्याने काम पूर्ण कधी होणार असा सवाल राम भक्तांनी केला आहे.लवकरात लवकर काम पूर्ण करावेश्री काळाराम मंदिर पूर्व दरवाजाबाहेर परिसर सुशोभीकरणाचे काम शासनाच्या माध्यमातून केले जात आहे. पुर्व दरवाजा समोर खोदकाम केलेल्या जागेवर पुरातन दगड टाकला जाणार असून सदर दगड हा नेवासा येथून आणला जाणार असल्याचे समजते. रामनवमीपूर्वी सदर सुशोभीकरणाचे काम पूर्ण करून मंदिराची शोभा कशाप्रकारे वाढेल याचा प्रयत्न प्रशासनातर्फे झाली पाहिजे.मंदार जानोरकर, विश्वस्त काळाराम मंदिर,
काळाराममंदिरा बाहेरील सुशोभिकरणाचे काम रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2020 4:21 PM
भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री काळाराम मंदिर पूर्व दरवाजा बाहेर सुशोभीकरणाचे काम सुरू असताना काही महिन्यांपूर्वी दगडी चबुतरा व पायऱ्या आढळून आल्या होत्या. या घटनेला तब्बल आठ महिन्यांचा कालावधी लोटला असला तरी अद्याप काळाराम मंदिर बाहेरील सुशोभीकरणाचे काम न झाल्याने भाविकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
ठळक मुद्देकाही महिन्यांपूर्वी दगडी चबुतरा व पायऱ्या आढळून आल्या होत्याराम मंदिर संपूर्ण भारतात प्रसिद्ध