नाशिक : जुन्या-नव्या काळातील मनाचा ठाव घेणारी गाणी, मजेशीर खेळांचे सादरीकरण हे सारे वृत्तपत्र विक्रेते व त्यांच्या कुटुंबीयांनी लोकमतच्या वतीने झालेल्या ‘सुमधुर गाणी व धमाल गेम शो’ कार्यक्रमात अनुभवत धमाल केली.गायक चेतन थाटसिंगार, संदीप थाटसिंगार, अॅँकर गुरू हरयानी या कलाकारांच्या वैविध्यपूर्ण आविष्कारांनी नटलेला हा कार्यक्रम शालिमार येथील परशुराम साईखेडकर नाट्यगृह येथे गुरुवारी (दि. १०) सायंकाळी उत्साहात पार पडला. व्यासपीठावर नाशिक शहर वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत पवार, सिडको वृत्तपत्र विक्रेता सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय ठाकरे, नाशिकरोड वृत्तपत्र विक्रेता सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सुनील मगर, सातपूर वृत्तपत्र विक्र ेता संघटनेचे अध्यक्ष विनोद कोर आदी उपस्थित होते. ऊन, पाऊस, हिवाळा कोणत्याही ऋतूत भल्या पहाटे उठून घरोघरी पेपर देणारे विक्रेते, आपल्या वैयक्तिक अडचणी बाजूला ठेवत वेळेशी स्पर्धा करणारे त्यांचे काम याची दखल घ्यावी या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तब्बल तीन तासांहून अधिक चाललेल्या या मनोरंजनात्मक कार्यक्रमात उपस्थितांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन धमाल केली. थाटसिंगार बंधंूनी ‘झिंगाट’, ‘मन उधाण वाºयाचे’ ‘नदीच्या पल्याड’, ‘गणेश वंदना’ आदी सादर केलेल्या एकापेक्षा एक मराठी, हिंदी गाण्यांवर उपस्थितांनी ठेका धरला. अॅँकर गुरू यांनी सर्व फुगे फोडणे, लेफ्ट राइट, सामान्यज्ञानावर आधारित प्रश्नोत्तरे, पहेली असे विविध मजेशीर खेळ घेतले. यातील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली. यावेळी उपस्थित वृत्तपत्र विक्र ेता बांधवांमधून सोडतीद्वारे भाग्यवंत विक्रे ता बांधव व परिवारास भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. लोकमतचे सहाय्यक उपाध्यक्ष बी. बी. चांडक यांनी प्रास्ताविक केले. विविध योजनांची त्यांनी माहिती दिली. लोकमतचे वितरण व्यवस्थापक अखिलेश पाठक यांनी उपस्थितांचे स्वागत केले. कैलास बडगुजर यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी वृत्तपत्र विक्रेते परिवारासह उपस्थित होते.
बहारदार गाणी, खेळांसह रंगले संमेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 12:04 AM