नाशिक : ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीणमधील १०० सराईत गुन्हेगारांच्या तडीपारीचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून, लवकरच या गुन्हेगारांना हद्दपार केले जाणार आहे. दरम्यान, यामध्ये सुरगाणा येथील सराईत गुन्हेगार व शहरासह ग्रामीणमध्ये बारा गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल असलेल्या श्यामू नागू पवार (रा.दवाखानापाडा, सुरगाणा) यास दीड वर्षासाठी जिल्ह्णातून तडीपार करण्यात आल्याचे आदेश कळवणचे उपविभागीय अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी काढले आहेत.ग्रामीण पोलीस हद्दीतील कायदा व सुव्यवस्था सुरळीत रहावी यासाठी सराईत गुन्हेगारांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे़ अधीक्षक दराडे यांच्या आदेशानुसार पोलीस ठाणेनिहाय सराईत गुन्हेगारांचीयादी व तडीपारीचे प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत़मालेगावचे अपर पोलीस अधीक्षक नीलोत्पल, विशाल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली १०० सराईत गुन्हेगारांचे प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत़ सद्य:स्थितीत जिल्ह्णातून १९ सराईतांना तडीपार करण्यात आलेले असून, त्यांच्यावर पोलिसांची करडी नजर आहे़विशेष म्हणजे सराईत पवारविरोधात तक्रार करण्यासाठी कोणीही पुढे येत नसल्यानेतसेच त्याची गुन्हेगारी व गुन्हेगारांना आश्रय दिल्याप्रकरणी तडीपारीची कारवाई करण्यात आलीआहे़सराईत पवारविरोधात सुरगाणा पोलिसांनी कळवण उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडे तडीपारीचा प्रस्ताव सादर केला होता़ त्यास उपविभागीय अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दीड वर्षासाठी जिल्ह्णातून तडीपार केले़गंभीर स्वरूपाचे गुन्हेसुरगाणा येथील श्यामू पवार या सराईत गुन्हेगारावर ग्रामीण पोलीस ठाण्यांमध्ये दंगल, हाणामारी, जिवे ठार मारण्याचा प्रयत्न, खून, दरोडा, घरफोडी, चोरी, मटका, जुगार यांसारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत, तर शहर पोलीस आयुक्तालयातील अंबडमध्ये दरोड्याची तयारी व पंचवटी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल आहे़
जिल्ह्यातील १०० सराईत गुन्हेगारांची तडीपारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 1:07 AM
ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीणमधील १०० सराईत गुन्हेगारांच्या तडीपारीचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून, लवकरच या गुन्हेगारांना हद्दपार केले जाणार आहे.
ठळक मुद्देग्रामीण पोलीस : श्यामू पवारची तडीपारी; गुन्हेगार रडारवर