नाशिक : जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या आता २६ हजार ७७४ इतकी झाली आहे. बुधवारी (दि. १८) उपचारार्थ दाखल १५ रुग्ण दगावले. यामध्ये नाशिक मनपा हद्दीतील ७, ग्रामीणमधील ६ आणि मालेगावतील एक व जिल्ह्याबाहेरील १ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात बुधवारी १ हजार १९७ रुग्णांनी यशस्वीपणे कोरोनावर मात केली. तसेच ८६४ नवे रु ग्ण आढळून आले. आतापर्यंत एकूण २२ हजार ४३ रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहेत.नाशिक शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातसुद्धा कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहे. बुधवारी जिल्ह्यात १ हजार ३६३ संशयित रुग्ण दाखल झाले. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी नाशिककरांना अधिकाधिक खबरदारी घेत शासनाने सांगितलेल्या उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी लागणार आहे. आगामी काळ सण-उत्सवांचा असल्याने सक्रमणाचा धोका अधिक वाढणार असल्याचे बोलले जात आहे. नाशिक ग्रामीणमध्ये २१९, नाशिक शहरात ६१० तर मालेगावात ३४ आणि जिल्ह्याबाहेरील एक असे ८६४ रुग्ण मिळून आले.सिन्नरला ७४० रुग्णांनी केला कोरोनाचा पराभवसिन्नर तालुक्यातील ७४० कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनाचा पराभव केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत बाधितांची संख्या १००३ झाली आहे. तालुक्यातील २४१ रुग्णांवर सिन्नर ग्रामीण रुग्णालय व इंडियाबुल्स कोविड रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आजपर्यंत तालुक्यात २२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.मालेगावी नवीन ५१ बाधितमालेगाव शहरासह तालुक्यातील ११९ जणांचा तपासणी अहवाल प्राप्त झाले असून, त्यात नवे५१ जण बाधित मिळून आले. तालुक्यातील निमगाव, रावळगाव, झोडगे, लेंडाणे, दाभाडी, येसगाव, अजंग, वडेल, निळगव्हाणसह शहरातील मालेगाव कॅम्प भागातील रुग्णांचा समावेश आहे.येवल्यातील तिघे बाधित कोरोनामुक्तयेवला शहरातील तिघे बाधित बुधवारी (दि.१९) कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. आरोग्य विभागाने विविध उपाययोजना सुरू केल्यानंतर बुधवारी (दि. १९) शहरातील दोन बाधित नाशिक येथील रुग्णालयातून तर एक बाभुळगाव येथील अलगीकरण कक्षातून असे एकूण तिघे पुरुष कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
जिल्ह्यात १ हजार रुग्णांची कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2020 1:14 AM
जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या आता २६ हजार ७७४ इतकी झाली आहे. बुधवारी (दि. १८) उपचारार्थ दाखल १५ रुग्ण दगावले. यामध्ये नाशिक मनपा हद्दीतील ७, ग्रामीणमधील ६ आणि मालेगावतील एक व जिल्ह्याबाहेरील १ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात बुधवारी १ हजार १९७ रुग्णांनी यशस्वीपणे कोरोनावर मात केली. तसेच ८६४ नवे रु ग्ण आढळून आले. आतापर्यंत एकूण २२ हजार ४३ रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहेत.
ठळक मुद्देदिवसभरात ८६४ नव्या रु ग्णांची भर; १५ जणांचा मृत्यू