नाशिक : उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे हृदयरोग उपचार केंद्र म्हणून ओळख असलेल्या एसएमबीटी हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये ५ वर्षात तब्बल ८ हजारांहून अधिक ॲन्जिओग्राफी आणि ५ हजारांवर ॲन्जिओप्लास्टी तर २ हजार रुग्णांचे बायपास करण्यात आले आहे. तसेच येत्या वर्षभरात हार्ट ट्रान्सप्लांटलची सुविधादेखील सुरु करण्यात येणार असल्याचे डॉ. विद्युतकुमार सिन्हा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
एसएमबीटी हॉस्पिटलने पाच वर्ष पूर्ण करून सहाव्या वर्षात पदार्पण केले आहे. या काळात शासकीय नियमात बसणाऱ्या आर्थिकदृष्ट्या कमकुवत रुग्णांवर सामाजिक जाणिवेतून मोफत तर इतरांना कमीत कमी खर्चात गुणवत्तापूर्ण उपचार देण्याचं काम एसएमबीटीने केले आहे. त्याचीच परिणती म्हणजे गेल्या पाच वर्षात ८८ हजारापेक्षा अधिक रुग्णांनी या सेवांचा लाभ घेतला असून नियमित ह्दय शस्त्रक्रियव्यतिरिक्त १५०० पेक्षा अधिक लहान मुलांच्या किचकट हृदय शस्त्रक्रिया करुन त्यांना नवीन आयुष्य देण्याचे काम एसएमबीटी हॉस्पिटलने केले असल्याचे डॉ. सिन्हा यांनी सांगितले. तर कार्डियाक बायपास, मिनिमल इनवेसिव सर्जरी, इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजी, पीडियाट्रिक कार्डिओलॉजी, पीडियाट्रिक कार्डियाक सर्जरी, इलेक्ट्रोफिजियोलॉजी आणि प्रिव्हेंटिव्ह कार्डिलॉजी यासह हृदयाशी संबंधित सर्व आजारांवर एकाच ठिकाणी अद्ययावत सोयीसुविधा व उपचार मिळत असल्याने रूग्णांचा वेळ आणि पैशाची बचत होते, असे डॉ. गौरव वर्मा यांनी सांगितले. तर पाचव्या वर्षपूर्तीनिमित्त पूर्ण एप्रिल महिन्यात १ तारखेला सर्व ॲन्जिओग्राफी मोफत तर पुढील महिन्यातील प्रत्येक ॲन्जिओप्लास्टीस सामान्य दरात इम्पोर्टेड स्टेन बसवले जाणार असल्याचे डाॅ. संतोष पवार यांनी सांगितले. यावेळी प्रीती झंवर यांनी हॉस्पिटल्सच्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
फोटो
२७एसएमबीटी