कोरोना रुग्णसंख्येने दिवसागणिक नवनवीन उच्चांक स्थापन कऱण्यास मार्च महिन्यातच प्रारंभ केला. गतवर्षी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक बाधित आढळून आले होते. त्यातदेखील सप्टेंबर महिन्यात एकदाच कोरोना बाधितांचा आकडा दोन हजारांवर गेला होता. त्यानंतर मार्च महिन्यातच एकदा दोनदा नव्हे तर सातत्याने दोन आठवडे त्या उच्चांकी आकड्याला ओलांडणारी बाधित संख्या पुढे येत आहे. दोन हजारांवर सहा वेळा बाधित झाल्यानंतर तीन हजार, चार हजार आणि पाच हजारांपर्यंत बाधितांच्या संख्येने मजल मारली. त्यामुळे बाधित संख्येने तर एका आठवड्यात वीस हजार बाधितांचा नवीन विक्रमदेखील प्रस्थापित केला आहे.
इन्फो
विक्रमी चाचण्या मार्च महिन्यात
नाशिक जिल्ह्यात गतवर्षी विक्रमी चाचण्यादेखील सप्टेंबर महिन्यात करण्यात आल्या होत्या. त्यावेळी सर्वाधिक म्हणजे १ लाख ३६ हजार ५८० इतक्या चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यातून ३८४९० इतके बाधित आढळले होते. त्यानंतर मार्च महिन्यात सुमारे पावणे दोन लाख चाचण्या करण्यात आल्या असून, त्यातून पन्नास हजारांवर बाधित आढळून आले आहेत.
इन्फो
गतवर्षी मार्चमध्ये प्रारंभ
गतवर्षी मार्च महिन्यात नाशिक जिल्ह्यात कोरोना चाचण्यांना प्रारंभ कऱण्यात आला होता. त्यामुळे चाचण्यांचे प्रमाण त्यावेळी अत्यल्प होते. गतवर्षीच्या मार्च महिन्यात अवघ्या ३१४ चाचण्या करण्यात आल्या असून, त्यातून केवळ एकमात्र रुग्ण बाधित आढळून आला होता. तो एकमेव रुग्ण २९ मार्चला बाधित आढळला असून, त्यानंतर पुढील बाधित रुग्ण आढळण्यास एप्रिल महिना उजाडला होता.
इन्फो
गत पाच महिन्यांपेक्षा तिप्पट
गतवर्षी मार्च, एप्रिल, मे, जून आणि जुलै या पाच महिन्यांमध्ये मिळून जेवढ्या चाचण्या करण्यात आल्या होत्या त्यापेक्षा तिप्पट चाचण्या यंदाच्या मार्च महिन्यात करण्यात आल्या आहेत. जिल्हा प्रशासनाकडून त्यांचे उपलब्ध संपूर्ण मनुष्यबळ वापरुन या चाचण्या केल्या जात आहेत. तरीदेखील चाचण्यांसाठीदेखील अनेक ठिकाणी रांगा लागल्याचे चित्र आरोग्य विभागासह सामान्य नागरिकांच्या दृष्टीनेदेखील चिंताजनक आहे.
-----------------------
स्टोरीला ग्राफ वापरता येईल.
गतवर्षी
ऑगस्ट २० - ७६ हजार ३१० चाचण्या, २२ हजार ९७० बाधित
सप्टेंबर २० - १लाख ३६ हजार ५८० चाचण्या, ३८ हजार ४९० बाधित
मार्च २१ - १ लाख ७५ हजार ३३२ चाचण्या, ५४ हजार ७४६ बाधित