शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
3
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
4
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
5
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
6
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
7
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
8
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
9
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
10
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
11
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
12
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
13
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
14
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
15
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
16
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
17
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
18
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
19
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
20
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप

तब्बल अडीच हजार पार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 4:14 AM

नाशिक : जिल्ह्यात कोरोनाने सलग तिसऱ्या दिवशी नवीन उच्चांक स्थापित केला. शुक्रवारी (दि. १९) दिवसभरात तब्बल २५०८ रुग्ण ...

नाशिक : जिल्ह्यात कोरोनाने सलग तिसऱ्या दिवशी नवीन उच्चांक स्थापित केला. शुक्रवारी (दि. १९) दिवसभरात तब्बल २५०८ रुग्ण बाधित रुग्ण आढळले असून कोरोनाने प्रथमच अडीच हजाराचा टप्पा ओलांडल्याने यंत्रणादेखील संभ्रमित झाली आहे. त्यामुळे जिल्हा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेकडे वाटचाल करु लागल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.

जिल्ह्यात शुक्रवारी तब्बल २५०८ बाधित रुग्ण तर ११६८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रात १,ग्रामीणला ३ तर जिल्हा बाह्य १ असा एकूण ५ जणांचा बळी गेल्याने आतापर्यंतच्या बळींची संख्या २२०२ वर पोहोचली आहे. गत आठवडाभरापासून कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने हजार ते पंधराशेवर राहिल्याने जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा हतबल झाली होती. त्यात बुधवारी कोरोनाबाधितांच्या आकड्याने २१४६ इतका उच्चांक तर गुरुवारी २४२१ पर्यंत बाधितांच्या आकड्याने मजल मारली होती. तर शुक्रवारी त्यापेक्षाही अधिक म्हणजे २५०८ बाधित आढळून आल्याने या वेगाने जिल्ह्याची वाटचाल कुठे सुरु आहे, त्याबाबत जनमानसात चर्चेला उधाण आले आहे.

इन्फाे

नाशिक मनपा क्षेत्रात १४१४

नाशिक महानगरपालिका क्षेत्रात शुक्रवारच्या एकाच दिवसभरात सर्वाधिक तब्बल १४१४ रुग्ण बाधित आढळून आले आहेत. महानगरात एकाच दिवशी इतक्या मोठ्या प्रमाणात बाधित आढळल्याने नाशिक महापालिका क्षेत्रात कोरोनाचा प्रसार सर्वाधिक वेगाने होत असल्याचे दिसून येत आहे. मनपा क्षेत्रात आरोग्य यंत्रणा प्रभावीपणे कार्यरत असताना आणि नागरिक जागरुक असतानाही कोरोनाबाधितांच्या वेगाने मनपाचा आरोग्य विभागदेखील चक्रावून गेला आहे.

इन्फो

दहा दिवसात बाधित वाढ १५ हजारांनजीक

जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत हजारावर भर पडण्यास ११ तारखेपासून प्रारंभ झाला. ११ मार्चला ११४०, १२ मार्चला ११३८ , १३ मार्चला १५२२, १४ मार्चला १३५६, १५ मार्चला १३७६, १६ मार्चला १३५४ असा सलग आठवडाभर कोरोनाबाधितांच्या संख्येने अक्षरश दररोज हजाराचा आकडा ओलांडला. त्यानंतर कोरोनाबाधितांचा गतवर्षापासूनचा नवीन उच्चांक तब्बल २१४६ बाधित १७ मार्चला, त्यानंतर पुन्हा १८ मार्चला नवीन उच्चांक २४२१ तर १९ मार्चला सर्वोच्च उच्चांक २५०८ वर पोहोचल्याने गत दहा दिवसात ही बाधित संख्या तब्बल १४ हजार ९९१ म्हणजे १५ हजारांनजीक पोहोचली आहे.

इन्फो

प्रलंबित अहवाल ५ हजार

जिल्ह्यात संशयितांची तपासणी आणि नमुने गोळा होण्याच्या प्रमाणात आठवडाभरात कमालीची वाढ झाली आहे. मात्र, नमुना तपासणीच्या संख्येत फारशी वाढ झालेली नाही. त्यामुळेच प्रलंबित अहवालाची संख्या सातत्याने वाढत असून शुक्रवारी ही प्रलंबित अहवाल संख्या ४९५७ वर पोहोचली आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस तरी कोरोना बाधितांचा आकडा मोठाच राहण्याची चिन्हे आहेत.