एकंदर सरसकट पीक कर्जमाफी नाहीच, अजित पवारांचे संकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2020 05:01 AM2020-02-01T05:01:49+5:302020-02-01T05:05:04+5:30
शाळा इमारतीच्या उद्घाटन सोहळ््याला अजित पवार यांनी सकाळी साडेसात वाजताच हजेरी लावली.
नाशिक : शासनाने दोन लाख रूपयांपर्यंत पीक कर्ज माफीचा निर्णय घेतला आहे. त्यापेक्षा अधिक असलेले कर्ज माफ करण्यासंदर्भात होत असलेली मागणीही रास्त आहे. त्यासाठी शासनाने समिती नेमली असून नियमित कर्ज फेड करणाऱ्यांना प्रोत्साहन अनुदान व दोन लाखापेक्षा जास्त कर्ज असणाऱ्यांना दिलासा देण्याची योजना आखली जात आहे. मात्र, त्यात काही कर्ज रक्कम भरण्याची तयारी ठेवा, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ंिदंडोरी तालुक्यातील लखमापूर येथे एका कार्यक्रमात सांगितले.
एकंदर सरसकट कर्जमाफी होणार नसल्याचेच संकेत त्यांनी दिले. राज्यातील विविध विभागांचा आढावा घेताना अनेक अधिकाºयांनी मनुष्यबळ कमी असल्याची अडचण सांगितली होती. गरजेनुसार राज्य शासन मेगाभरती करणार असल्याचा पुनरुच्चार पवार यांनी केला.
अजित पवार पुढे म्हणाले की, भरती करताना कोणत्या खात्याला किती मनुष्यबळाची आवश्यकता आहे, याची पडताळणी करूनच भरती केली जाणार आहे.
काही खात्यांमध्ये प्राधान्याने कर्मचाºयांची गरज आहे, तेथे भरतीलाला प्राधान्य दिले जाईल. पोलीस खात्यात आठ हजार कर्मचाºयांची भरती आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.
दोन लाखांवरील कर्जाबाबत १५ दिवसांत अहवाल - कृषिमंत्री भुसे
दोनलाखांवर कर्ज असलेल्या तसेच नियमित कर्जाची परतफेड करणाºया शेतकºयांबाबत स्थापन झालेल्या समितीचा अहवाल
पंधरा दिवसांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठविला जाईल, अशी माहिती कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिली.
हा बाबा सकाळी शपथ घेतो तेव्हा...
शाळा इमारतीच्या उद्घाटन सोहळ््याला अजित पवार यांनी सकाळी साडेसात वाजताच हजेरी लावली. ते म्हणाले, मी थंडीत कार्यक्रमाला आलो. तुमची झोप मोडली. त्याबद्दल क्षमा मागतो. आमदारांकडे मी एवढ्या सकाळी कार्यक्रमाला येईल की नाही, याबाबत एकाने शंका व्यक्त केली. पण दुसरा त्याला म्हणाला, हा बाबा सकाळी सकाळी शपथ घेतो, तेव्हा येईलच, असे म्हणताच हशा पिकला.