लोकमत न्यूज नेटवर्कइंदिरानगर : जादा रकमेची वीजदेयके आल्याने नागरिकांना शॉक बसला असून, जादा रक्कम कमी करण्याच्या मागणीचे निवेदन शिवसेनेच्या वतीने अधीक्षक अभियंता प्रेरणा बनकर यांना देण्यात आले.कोरोनाच्या महासंकटामुळे गोरगरिबांचा रोजगार हिरावला गेला आहे, तसेच कामधंदा बंद असल्यामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. लॉकडाऊन काळात दरवाढ केल्यामुळे भरमसाठ रकमेची वीजबिले आली असून, नागरिकांपुढे आर्थिक प्रश्न निर्माण झाला आहे. वीज वितरणने केलेली दरवाढ रद्द करावी, तसेच जुन्या दरानुसार बिलांची आकारणी करावी, देयके भरण्यास सवलत द्यावी, देयके भरण्यासाठी तगादा लावू नये, ग्राहकांची वीजजोडणी तोडू नये, तसेचस्थिर आकारातील वाढ कमी करावी व व्याजदेखील कमी करूनसुधारित बिले द्यावीत, वीज वितरण कंपनीने अतिरेक करून ग्राहकांची पिळवणूक करू नये आदीमागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.वीज वितरणचे कार्यकारी अभियंता बनकर यांना शिवसेना विभागप्रमुख नीलेश साळुंखे यांनी निवेदन दिले. यावेळी शिवसेना विभागप्रमुख सुयश पाटील, उपविभागप्रमुख योगेश आलई, निखिल मेहंदळे उपस्थित होते. इंदिरानगर परिसरात विजेचा लपंडाव सुरूचइंदिरानगर परिसरात विजेचा लपंडाव सुरूच असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. तातडीने वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून महारु द्र कॉलनी,अरु णोदय सोसायटी, मानस कॉलनी, देवदत्त सोसायटी, जिल्हा परिषद कॉलनी, मोदकेश्वर कॉलनी, सिद्धिविनायक सोसायटी, आत्मविश्वास सोसायटी, इंदिरानगर,शास्रीनगर, वडाळा गावसह परिसरात दिवसभरात अर्धा ते एक तास वीजपुरवठा खंडित होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शाळा व महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. काही शाळांनी आॅनलाइन शिक्षण सुरू केले आहे. खंडित वीजपुरवठ्यामुळे विद्यार्थ्यांना आॅनलाइन शिक्षण घेणेसुद्धा अडचणीचे ठरत आहे. तसेच विद्युत उपकरणांचे नुकसान होत आहे. नागरिकांना आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
जादा रकमेची आकारणी; ग्राहकांना बसला ‘शॉक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2020 8:59 PM
इंदिरानगर : जादा रकमेची वीजदेयके आल्याने नागरिकांना शॉक बसला असून, जादा रक्कम कमी करण्याच्या मागणीचे निवेदन शिवसेनेच्या वतीने अधीक्षक अभियंता प्रेरणा बनकर यांना देण्यात आले.
ठळक मुद्दे वीजपुरवठा तातडीने सुरळीत करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.