नाशिक : जिल्ह्यातील कोरोनाची रु ग्णसंख्या वाढू लागली आहे. गुरु वारी (दि.१७) नव्याने १ हजार ५९७ रु ग्ण आढळून आले. शहरात १ हजार २१ नवे रु ग्ण सापडले. ग्रामिण भागात ५४६ तर मालेगावात २२ रु ग्ण आढळून आले. यामुळे जिल्ह्याची एकूण रु ग्णसंख्या आता ५९ हजार ५८५ इतकी झाली आहे. १ हजार ७१८ रु ग्णांनी कोरोनावर मात केली.जिल्ह्यात दिवसभरात १९ रु ग्णांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. यामध्ये शहरातील ७, ग्रामिण ८ मालेगावा बाह्य येथील ४ रु ग्णाचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मृतांचा एकूण आकडा १ हजार १२६ वर पोहचला आहे. नाशिक शहरात आतापर्यंत ६२१ तर ग्रामिणमध्ये ३४२ रु ग्ण कोरोनाने मृत्युमुखी पडले आहेत. दिवसभरात जिल्हयात १ हजार ८७५ संशियत रु ग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४९ हजार ७१४ रु ग्ण निगेटिव्ह आढळून आले आहेत. सध्या जिल्हयात आतापर्यंत ४८ हजार १२३ रु ग्णांनी कोरोनावर विजय मिळविला आहे. तसेच १० हजार ३३६ रु ग्ण उपचार घेत आहेत. १ हजार ६३ नमुना चाचणी अहवाल आतापर्यंत प्रलंबित आहेत. कोरोना शहरासह जिल्ह्यात नियंत्रणात आणण्यासाठी नाशिककरांना अधिकाधिक खबरदारी घेत शासनाने सांगितलेल्या उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी लागणार आहे.