शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

योगशास्त्राद्वारे करा ‘डिप्रेशन’वर मात...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2020 11:01 PM

डिप्रेशन म्हणजेच जगण्याचा नकारात्मक दृष्टीकोन आणि स्वत्वाशी अनुकूलन असमर्थता.

ठळक मुद्देडिप्रेशनची योगद्वारे चिकित्साचे चार मुख्य टप्पेडिप्रेशन म्हणजे शरीर आणि मन ह्यांचा एकमेकांशी असहयोग

नाशिक :  डिप्रेशन म्हणजे शरीर आणि मन ह्यांचा एकमेकांशी असहयोग, काही अनपेक्षित, अप्रकृतिक मानसिक विचारांमुळे दोघांमध्ये तारतम्य रहात नाही आणि परिणमी(स्वरूप) शरीर आणि मनाच्या ऊर्जा प्रवाहात अडथळा निर्माण होतो.अश्या अवस्थेत रुग्णांमध्ये अत्याधिक थकवा, निर्जिवता, उदासीनता आणि भावनात्मक कमकुवतपणा हे लक्षणे दिसून येतात. डिप्रेशन म्हणजेच जगण्याचा नकारात्मक दृष्टीकोन आणि स्वत्वाशी अनुकूलन असमर्थता.जेव्हा ही अवस्था फक्त क्षणिक असते आणि ती थोड्या वेळाने आपोआप निघून जाते तर ती स्वाभाविक आहे, पण जर ही मनः स्थिती सातत्याने अस्तिस्त्वात असते तर परिणाम घातक सुद्धा होऊ शकतात. ही प्रतिकूलता विकृतीला जन्म देते. अश्या अवस्थेत रुग्ण स्वतःला समाज आणि कुटुंबापासून वेगळा करून घेतो आणि तीव्रवस्था मध्ये जगण्याला ही नाकारू शकतो.डिप्रेशन कमी करण्यामध्ये योगशस्त्राचे अवलंबन खूप प्रभावी ठरतो. डिप्रेशन च उपचार करण्यासाठी योग शास्त्र आपली भौतिक आणि मानसिक ऊर्जा संतुलीत करण्याचे कार्य करते.डिप्रेशन ची योगद्वारे चिकित्साचे चार मुख्य टप्पे आहेत.१. प्राणायाम२. योगासने आणि बंध३. षटकर्म.४.उचित आहार व जीवन शैली.

१. प्राणायाम हा डिप्रेशनच्या तीव्रावस्था मध्ये सुद्धा प्रभावी ठरतो.सर्वप्रथम रुग्णाला मैत्रीपुर्ण वातावरणात प्राणायाम साठी तय्यार करणे, पद्मासन मध्ये बसवून आधी दीर्घ श्वसन घ्यायला लावणे. रुग्णाचे चित्त (मन) थोडे शांत होईल, आत्ता नाडी शोधन प्राणायाम करून घेणे. जर उन्हाळा असेल तर शीतली प्राणायाम आणि हिवाळा असेल तर काळजी पूर्वक भस्त्रिका प्राणायाम करायला लावणे.आहे दोन ते तीन अवर्तने करून घेता यईल. आता ओंकार नाद करायला सांगणे ह्यात प्रथम *ओ* चा उच्चार दीर्घ असेल ह्याने गळ्यातील स्नायू कंपन होतीलआणि रुग्णाला थोडा बळ आणि सहजता प्राप्त होते. तत्पश्चात *ओ* चा उच्चार लघु असेल आणि *म* हे दीर्घ करून ओंकार नाद करून घेणे, ह्या कंपनाने टाळू आणि मस्तिष्क प्रभावित होतात आणि रुग्णाची तणाव आणि नैराश्य ची स्थिती नाहीसी होते. आता थोडा विश्राम आणि रुग्णाला शवासन मध्ये झोपायला सांगणे, त्याला शांत झोप येईल. ह्या प्रकियेचे परिणाम लगेच दिसून येतात, रुग्ण उठल्यावर लक्ष्यात येईल की डिप्रेशन ची तीव्रता निघून गेलेली आहे आणि त्याला सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह जाणवतो आहे.मात्र हळू हळू अशाप्रकारे प्राणायामाचे सराव दिनचर्या चा एक भाग म्हणून करायला प्रवृत करायचं जेणेकरून दीर्घकाळ फायदे दिसून येतील.

२. योगासने आणि बंधवेगवेगळे योगासनांच्या माध्यमातून हठयोग च अभ्यास होतो. शरीर व मन ह्या मध्ये ऊर्जा आणि प्राण प्रवाह संतुलित होतो, परिणामस्वरूप शरीर व मन एकमेकांसाठी अनुकूल होतात आणि स्वास्थ्य प्रस्थापित होते.पश्चिमोत्तनासान, भुजंगासन, उत्तान पदासान, नौकासन, उष्ट्रासन , धनुरासन, अर्धमत्सेंद्र आसान.ह्या असनांच्या माध्यमातून शरीर मध्ये 'हॅपी हॉर्मोन्स'चा स्राव वाढतो आणि त्याचा मूड चांगला होण्यास मदत होते.योगासनांचे विभिन्न अवस्थेनुसार वेगवेगळे प्रकार आपल्याला रुग्णांमध्ये करून घेता येतात.

३. षटकर्मप्राणायाम आणि योगासन ह्यांचा नियमित अभ्यास चालू झाले की डिप्रेशन चे तीव्र अवस्थेचे एपिसोड्स कमी होतात. आत्ता मात्र षटकर्म( नेती,धौती,बस्ती, नौली, कपालभाती आणि त्राटक) द्वारे शरीराचा शोधन आवश्यक ठरतो. शरीरात साचलेले दोष ह्या षट कर्म शोधनातून बाहेर काढले जातात.

४. उचित पोषकआहार आणि जीवन शैलीशरीर शुध्दीकरण नंतर मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य प्रस्थापित करण्यासाठी योग्य आहार, विचार, निद्रा आणि जीवन शैली साठी समुपदेशन सुधा योग शास्त्र मध्ये समाविष्ट आहे.ह्या तऱ्हेने योग शास्त्र डिप्रेशन वर आपल्याला विजय नक्कीच मिळवून देते.स्वस्थ संतुलित असा आहारआहारातील घटक द्रव्य आपल्या आवडीनुसार नाही तर आपल्या शरीरासाठी काय चांगलं आणि काय वाईट ह्या गोष्टीवर ठरवले पाहिजे. फक्त योग्य आहार निवडणेच पुरेसे नाही ,आपण ते कसं खातो, किती खातो, कधी खातो, कशा सोबत खातो....ह्या अन्नपान विधी चा ही विचार आवश्यक आहे.

मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण हेहीज्या प्रमाणे शारीरिक व्यायाम केला नाही तर त्याचे वाईट परिणाम आपल्या शरीरावर आणि उत्साहावर होतात, याचप्रमाणे मानसिक व्यायाम केले नाही तर त्यामुळे आपली न्युरोलॉजिकल यंत्रणा कमकुवत व्हायला लागते.नवीन आव्हानात्मक कार्य, विविध खेळ खेळणे,गप्पा गोष्टीं करणे हे सर्व अगदी साधे मानसिक व्यायामाचेच प्रकार आहेत, हे केल्या मुळे नवचैतन्य निर्माण होतं आणि एकाकीपणा मुळे येणारी निराशा ही नाहीशी होते. *तणाव* कमी करण्यासाठी जागरूक(माईंडफुल) राहासतत क्रियाशील राहणे सुद्धा योग्य जीवन शैली चा एक भाग आहेनिद्रा योग्य प्रमाणात व योग्य वेळेत शांत झोप घेणे हे ही आपल्या शारीरिक व मानसिक आरोग्याचा महत्वपूर्ण घटक आहे.*योग निद्रा* योग शास्त्र मध्ये ह्याला अध्यात्मिक निद्रा असे ही सांगितले आहे. विविध योग असानांच्या शेवटी किवा झोप येण्या पूर्वी योग निद्रेचा अभ्यास शारीराला तणाव मुक्त होण्यासाठी मदत करते. ह्या तऱ्हेने योग शास्त्र 'डिप्रेशन' वर आपल्याला विजय नक्कीच मिळवून देतो.

- डॉ. प्रिती भरत त्रिवेदी,  एम.डी. (आयुर्वेद) पी.जी.एफ.पी

 

टॅग्स :YogaयोगHealth Tipsहेल्थ टिप्सNashikनाशिक