नाशिक- शहरात कोरोनाचा संसर्ग जीवघेणा होत आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी कामे करण्यास शासकीय कर्मचारीदेखील तयार होती नाहीत. मात्र, महापालिकेच्या शाळांमधील ६०७ शिक्षकांना कोरोना संदर्भातील विविध जबाबदाऱ्या देण्यात आल्या आल्या होत्या. त्यातील सुमारे शिक्षकांना कोरोना संसर्ग झाला. त्यानंतरही बरे हेाऊन ते पुन्हा कर्तव्यावर हजर झाले आहेत. दुर्दैवाने दाेन शिक्षकांचा मृत्यू झाला आहे.
नाशिक महापालिकेचे आयुक्त कैलास जाधव आणि शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांनी या शिक्षकांच्या कार्याचे कौतुक केले आहे. शहरात सर्वत्र कोराेनाचा संसर्ग वेगाने पसरत असून शासकीय आणि निमशासकीय यंत्रणा जोखीम पत्करून कामे करीत आहेत. अनेकदा अन्य विभागातील कर्मचाऱ्यांची मदत घ्यावी लागत आहे. त्यानुसारच महापालिकेच्या ८९ प्राथमिक शाळांमधील ८८२ शिक्षकांपैकी ६०७ शिक्षकांना कोरोना संदर्भात आयुक्त कैलास जाधव यांनी विविध कामे सोपवली होती. यात महापालिकेच्या सहा विभागांतर्गत यूपीएचसी पथकांची निर्मिती करून त्यानुसार त्यांना घरोघर सर्वेक्षण करून हदयरोग, मूत्रपिंड विकार, उच्च रक्तदाब, मधुमेह आणि तत्सम व्याधीग्रस्तांच्या नेांदी करणे, सारी इलीचे रुग्ण शोधणे, तसेच बाधितांच्या घरावर स्टिकर्स लावणे अशा विविध प्रकारची कामे त्यांना सोपवण्यात आली आहे. कर्तव्य बजावताना यातील सुमारे ७० शिक्षकांना कोरेाना संसर्ग झाला. मात्र, त्यानंतरही ते बरे झाल्यानंतर पुन्हा कर्तव्यावर हजर झाले आहेत. दोन शिक्षकांचा दुर्दैवाने मृत्यू झाल्याची माहिती शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांनी दिली.
या शिक्षकांचा १४ दिवसांचा विलगीकरणाचा कालावधी संपल्यानंतर न डगमगता त्यांना नेमणूक दिलेल्या ठिकाणी ते कामावर हजर झालेले आहेत. हे शिक्षक गेल्या एक महिन्यांपासून उन्हाळा, आजार याची काहीही तमा न करता कोणताही विरोध न करता अत्यंत मनापासून व प्रामाणिकपणे काम करत असल्याबाबत प्रशासन अधिकारी सुनीता धनगर यांनी सर्व शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे.
इन्फो...
सेंट्रल बेड रिझर्वेशन सिस्टिम म्हणजे कोविड रुग्णालयातील आरक्षित बेडची अद्ययावत माहिती देण्यासाठी असलेल्या प्रणालीसाठी शिक्षक नियुक्तीवरून गेल्या आठवड्यात वाद प्रवाद झाले. मात्र, महापालिकेचे २२० शिक्षक हे विनाविरोध काम नेटाने करीत आहेत.