शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या पुढाऱ्यांचा राग माझ्यावर काढू नका"; अजित पवार ग्रामस्थांशी काय बोलले?
2
Maharashtra Election 2024: गुलाबराव विरुद्ध गुलाबराव; मंत्री बनवणाऱ्या 'या' मतदारसंघात चुरशीची लढत
3
“बंडखोरी केलेले लोक आमचेच, समजूत काढण्यात यश येईल”; देवेंद्र फडणवीसांना विश्वास
4
मराठा आंदोलकांच्या घोषणाबाजीने भाजपा उमेदवार मेघना बोर्डीकरांचा गावातून काढता पाय
5
आज मुहूर्त ट्रेडिंगवर खरेदी करा 'हे' 10 स्‍टॉक...तज्ज्ञांना दमदार परताव्याची आशा
6
चेन्नईनं १८ कोटी का मोजले? Ravindra Jadeja नं मुंबईच्या मैदानात दिलं उत्तर
7
शौर्य, धैर्य अन् प्रेमाचा संगीतमय नजराणा! दिवाळीच्या मुहुर्तावर 'संगीत मानापमान'चा टीझर, 'या' दिवशी प्रदर्शित होणार चित्रपट
8
Diwali Padwa 2024: दिवाळी पाडव्याला बायकोने नवर्‍याचे औक्षण करण्यामागे आहे एक लोभस कथा!
9
अबू आझमींच्या अडचणी वाढणार?; सोमय्यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार; प्रकरण काय?
10
"इंपोर्टेड माल", अरविंद सावंत यांनी आक्षेपार्ह शब्द वापल्याचा शायना एनसींचा आरोप, सावंत म्हणाले...
11
अग्निकल्लोळ! देवघरातील दिव्यामुळे लागली भीषण आग; दिवाळीच्या दिवशी ३ जणांचा मृत्यू
12
५०० रुपयांपेक्षाही कमी किंमतीत BSNL चा प्लॅन; दीर्घ वैधतेसह मिळणार एक्स्ट्रा डेटा
13
शरद पवार गटाचे उमेदवार समरजित घाटगे अंतरवालीत; मनोज जरांगेंची घेतली भेट, २ तास चर्चा
14
IPL 2025 : स्टार्क, KL राहुल ते मॅक्सवेल! टॉप-१० खेळाडू ज्यांना संघांनी दाखवला बाहेरचा रस्ता
15
"हिरवे कंदिल लावले असते, तर..."; मनसेचा शिवसेना ठाकरे गटाला थेट सवाल
16
शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते काँग्रेसच्या प्रचारात; भाजपच्या बंडखोर महिला नेत्याचा मोठा दावा
17
दररोज 6 कोटी रुपयांची फसवणूक, 'डिजिटल अरेस्ट' घोटाळ्यात हराजो लोकांचे नुकसान
18
महायुतीत बंडखोरांचा ३६ चा आकडा, त्यापैकी १९ भाजपाचे; बंड शमले नाहीतर युती-आघाडीला ५० जागांवर फटका
19
Aishwarya Rai Birthday: इन्स्टावर १४.४ मिलियन फॉलोवर्स, पण 'त्या' एका व्यक्तीलाच फॉलो करते मिस वर्ल्ड, कोण आहे ती?
20
धनंजय मुंडे यांच्या २०१९ च्या शपथपत्रात तीन, तर २०२४ मध्ये पाच अपत्यांचा उल्लेख!

जिल्ह्यात क्षमतेपेक्षा अधिक ऊस वाहतूक पुन्हा ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2020 7:37 PM

गणेश शेवरे, पिंपळगाव बसवंत : गळीत हंगाम सुरू झाल्यानंतर वाहनाच्या क्षमतेहून अधिक ऊस वाहतुकीमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. रानमळा परिसरात गुरुवारी (दि. १७) मध्यरात्री डबल ट्रॉली लावून उस वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटल्याने ऊस वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

ठळक मुद्देअपघातांना निमंत्रण : प्रादेशिक परिवहन कार्यालय कारवाईबाबत ढिम्म

निफाड- पिंपळगाव रस्त्यावर मागील दोन, तीन वर्षांत ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचे शंभरहून अधिक अपघात झाले आहेत. यात काहींना जीव गमवावा लागला तर काही अपंग झाले आहेत. तरीही रस्त्यावरून दोन ट्रॉलींसह ऊस वाहतूक सर्रास सुरू आहे. ऊस गाळप हंगाम सुरू झाल्यावर प्रत्येकवर्षी अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होते. परिसरात मागील वर्षीच्या गाळप हंगामातील केवळ तीन महिन्यात सहा अपघात झाले. त्यात ३ जणांना जीव गमवावा लागला होता. तर ३ जण अजूनही त्रास सहन करत आहेत. दोन महिन्यांपूर्वी एका आठ वर्षाच्या चिमुरडीला आपले पाय व वडील गमवावे लागले. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून, या अपघातांची नोंददेखील घेत नसल्याने सदोष वाहतुकीमुळे अपघातांच्या संख्येत वाढ होत आहेकारखाना प्रशासनाचे दुर्लक्षच....वाहतूक नियमांबाबत जनजागृती केली जात नाही. कारखाना प्रशासनाचा वचक ट्रॅक्टरचालकांवर नसल्याने बेफिकीर बेकायदेशीर ऊस वाहतूक केली जाते. यामुळे वारंवार दुर्घटना घडताना दिसतात. तरीही कारखाना प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत आले आहे.सुरक्षासप्ताह केवळ दिखाऊउप-प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून प्रत्येक वर्षी सुरक्षा सप्ताह छायाचित्रांपुरता साजरा केला जातो, असे दिसते आहे. या कार्यालयाकडून साखर कारखान्यांवर जाऊन ट्रॅक्‍टर, ट्रेलरला रेडियम पट्ट्या लावून हा सप्ताह साजरा केला जातो; मात्र आजही या ऊस वाहतूक तसेच इतर वाहनांकडून सुरक्षेच्या दृष्टीने गांभीर्याने पाहिले जात नाही. असे असतानाही या कार्यालयाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई केल्याचे दिसून येत नाही.अवजड वाहतुकीचे निकषछोटे टेम्पो - १ ते ३ टनमोठे टेम्पो - ३ ते ९ टन६ चाकी ट्रक - १० टनट्रॅक्टर -१४ ते १५ टन१० चाकी ट्रक - १७ टन१२ चाकी ट्रक - २२ टन१४ चाकी ट्रक - २७ टनओव्हरलोडिंग रोखण्याची कोणतीच यंत्रणा आरटीओकडे नाही. संपूर्ण जिल्ह्यात हा गंभीर प्रश्न आहे, तर तपासणी करण्यासाठीदेखील पुरेशी पथके नाहीत. जी पथके आहेत, त्या पथकांच्या कारवाया कागदोपत्रीच असतात. चिरीमिरीमुळे ठोस कारवाया होत नसल्याने ओव्हरलोडिंग राजरोस सुरूच आहे.- उद्धवराजे शिंदे, पिंपळगाव बसवंतअपघातानंतर ट्रॅक्टरचालक पसार होतात. दोन ट्रॉली एका ट्रॅक्टरला जोडून त्यामध्ये उसाची आणि इतरही वाहतूक करणे बेकायदेशीर आहे; मात्र सर्रास ही वाहतूक सुरू असून, आरटीओकडून ग्रामीण भागातील रस्त्यांवर सुरू असलेली ही जीवघेणी वाहतूक बंद का केली जात नाही, हा प्रश्नच आहे.- प्रशांत मोरे, रानमळा, पिंपळगाव.

टॅग्स :NashikनाशिकAccidentअपघात